सनपूले येथे विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे दिड एकर वरील मक्का व ठिबक नळ्या जळून खाक लाखो रुपयांचे नुकसान
चोपडा,दि. 20(प्रतिनिधी) तालुक्यातील सनपूले येथील शेत शिवारात संजय ज्ञानेश्वर पाटील यांच्या गट नंबर 397 मधील शेतातील मक्का विद्युत डिपी वर झालेल्या शॉर्ट सर्किट मुळे पूर्णतः जळून खाक झाल्याची ही घटना घडली. काल दुपारी 2 वाजेच्या सुमारास शेतातील मजूर घरी गेल्यानंतर दिवसपाळी लाईट सुरू असल्याने दुपारी अचानक शॉर्ट सर्किट झाले त्यात संबंधित शेतातील मक्का पूर्णतः जळून खाक झाला व त्यात आय एस आय कंपनीच्या ठिबक नळ्या देखील पूर्ण बेचिराख झाल्या आहेत .
यात शेतकऱ्याचे लाखों रूपयाचे नुकसान झाले असून 5 महिन्यापासून लहान मुलाप्रमाणे पीक वाढीस लाऊन वेळोवेळी खत, वॉटर सोल्यूबल खते, निंदनी करून, शेतकरी पीक वाढीस लावतो त्यात असे संकट ओढवल्याने शेतकरी पुरता खचून गेला आहे.तसेच मागील महिन्यात अवकाळी पावसाने नुकसान केले होते आता पुन्हा ऐन तोंडाशी आलेला घास वीज वितरण कंपनीच्या हलगर्जी पणामुळे मातीत बेचिराख झालाआहे.शॉर्ट सर्किट सारख्या घटना नेहमीच शेतात घडत असतात त्या मुळे आज शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे .तरी पंचनामा करून महा वितरण कंपनी कडून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी संजय पाटील यांनी केली आहे
...........चौकट .........
-> दुपारी अचानक झालेल्या शॉक सर्कीटमुळे माझ्या शेतातील ट्रान्स फॉर्मर मध्ये मोठा आवाज झाला व क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले त्यात क्षणात शेतातील मका व ठिबकच्या नळ्या जळून पूर्ण पणे खाक झाल्या यात माझे एक लाखाच्या वर नुकसान झाले आहे तरी मला भरपाई मिळावी व तसेच लोंबकलेले तार व वाकलेले विद्युत पोल कंपनी कडून तात्काळ सुरळीत व्हावेत.
संजय पाटील
*शेतकरी सनपुले ता .चोपड़ा*
...................................
