शेतकरी एकनाथ भोई यांची सतर्कता आणि वन अधिकारी बी.के.थोरात यांच्या कर्तव्य तत्परतेने कोल्ह्याच्या पिलाचा वाचला जीव
चोपडा दि.१७(प्रतिनिधी) :अनेर पासून जवळच असलेले वेळोदे येथील प्रगतशील शेतकरी एकनाथ चुनीलाल भोई यांचे वेळोदे शिवारात असलेले शेतात दोन दिवसापासून कोल्हा जातीचे लहानसे पिल्लू आढळून येत असल्याने त्यांनी वन विभागाला दूरध्वनीच्या साह्याने संपर्क साधून सर्व माहिती दिल्यामुळे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आर एफ ओ बी. के. थोरात यांनी तात्काळ आपली टीम घेऊन घटनास्थळी दाखल झाले. शेतात पाहणी केल्यानंतर कोणीतरी अज्ञात वाहनाने धडक दिले असल्याने कोल्हा जातीचे पिल्लूचे कंबर्डे मोडल्याचे आढळून आल्याने त्या पिल्लाला पिंजऱ्याच्या साह्याने चोपडा येथे फॉरेस्ट वन विभागाने पशुवैद्यकीय दवाखाना येथे उपचारासाठी आणण्यात आले.वेळीच उपचार झाल्याने पिलास जीवदान मिळाले आहे.
यावेळी घटनास्थळी वनरक्षक शुभम पाटील, राहुल पाटील, वनसेवक रोहित चौधरी, वाहन चालक मनोज मोरे व शेतकरी एकनाथ भोई यांनी परिश्रम घेतले.
............चौकट.........
आम्ही शेतात जाऊन पाहणी केली असता. कंबर मोडल्यामुळे उचलून चोपडा येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन गेलो. असता त्याच्यावरती प्रथम उपचार गोळ्या औषधी दिल्या . व व्यवस्थित खाऊ पिऊ घातल्यामुळे त्याच्या तब्येतीत सुधारणा होताना दिसून येत आहे. असे सांगून
शेतकरी एकनाथ भोई यांचे सुद्धा आभार मानतो..
*आर एफ ओ बी . के . थोरात.*
