लोकनायक- शिक्षणाच्या पंढरीचा 'विठ्ठल' दादासाहेब डॉ.सुरेश बोरोले
जळगाव जिल्ह्याच्या मातीत अनेक रत्ने जन्माला आली, पण सामान्य माणसाच्या डोळ्यांतील अश्रू पुसून तेथे शिक्षणाचे अंजन घालणारे व्यक्तिमत्व म्हणजे दादासाहेब डॉ. सुरेश पंडित बोरोले..! त्यांचा वाढदिवस.
हा केवळ एका व्यक्तीचा वाढदिवस नसून, हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळालेल्या पंखांचा उत्सव आहे. आडगावच्या मातीतून वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात करून शून्यातून *'पंकज'* नावाचे भव्य शैक्षणिक साम्राज्य उभे करणारा हा महामेरू खऱ्या अर्थाने 'लोकांचा नेता'ठरला आहे.
• आदरणीय ताईसाहेब- दादासाहेबांच्या यशाचे 'शक्तीस्थान'
दादासाहेबांच्या या अलौकिक प्रवासात त्यांच्या अर्धांगिनी मातृतुल्य आदरणीय ताईसाहेब सौ. हेमलता सुरेश बोरोले यांचा वाटा हिमालयासारखा अढळ आहे. खऱ्या अर्थाने दादासाहेबांच्या प्रत्येक स्वप्नाला प्रेमळ पंख देणारे शक्तिस्थान ठरल्या आहेत.ॐ मातृस्वरूपिण्यै शुभं भवतु सर्वदा।या उक्तीप्रमाणे, कर्मचाऱ्यांच्या दुःखात मातृहृदयाने धीर देणाऱ्या आणिआर्थिक-भावनिक संकटात खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या ताईसाहेब म्हणजे पंकज परिवाराची *'माऊली'* आहेत.
•वारसा कर्तृत्वाचा- सुपुत्र भैय्यासाहेब पंकज बोरोले
दादासाहेबांच्या संघर्षातून उभा राहिलेला हा *वटवृक्ष*
आज त्यांचे सुपुत्र भैय्यासाहेब श्री. पंकज सुरेश बोरोले (अध्यक्ष, पंकज संस्था व उपनगराध्यक्ष, चोपडा) अत्यंत समर्थपणे पुढे नेत्त आहेत.
पंकज बिल्डर्स आणि पंकज शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी विकास आणि संस्कारांची सांगड घातली आहे.रोटरी क्लबच्या Assistant Governor Elect (RID 3030)* पदावरून त्यांनी समाजसेवेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. प्रामाणिकता, संयम आणि सामाजिक बांधिलकी ही त्यांच्या नेतृत्वाची *त्रिसूत्री* आहे.
• वैद्यकीय क्षेत्रातील उत्तुंग यश- सुकन्या डॉ. चारुशीला बोरोले-पाळवदे*
दादासाहेबांच्या *'सेवा' परमो धर्म:*या मूल्याचा वारसा त्यांच्या सुकन्या डॉ. चारुशीला बोरोले-पाळवदे या पुण्याच्या वैद्यकीय क्षेत्रात समर्थपणे जपत आहेत.बाणेर येथील *'बेनेकेअर हॉस्पिटल'च्या संचालिका आणि प्रसिद्ध स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ (IVF Specialist) म्हणून त्यांनी २,५०० हून अधिक जोडप्यांच्या आयुष्यात मातृत्वाचा आनंद फुलवला आहे. जर्मनी आणि यूएई मधून उच्च शिक्षण घेतलेल्या डॉ. चारुशीला आज एक 'हाय-रिस्क ऑब्स्टेट्रिशियन'म्हणून नावाजल्या जात आहेत.
• सौ. दिपाली पंकज बोरोले-
संस्कारांची जपणूककुटुंबाचा हा वेलू गगनावर जाताना त्याला घरच्या *सुनबाई सौ. दिपाली पंकज बोरोले यांची मोलाची साथ लाभत आहे. अतिशय संस्कारक्षम पद्धतीने कुटुंबाची धुरा सांभाळत, त्या दादासाहेबांच्या मूल्यांची आणि कौटुंबिक सौहार्दाची जपणूक करत आहेत.
. • 'कीर्ती सुगंध' आणि भविष्याचा वेध
दादासाहेबांचा जीवनप्रवास त्यांच्या 'कीर्ती सुगंध' या आत्मकथनातून मांडला गेला आहे. वैद्यकीय क्षेत्रातून सुरू झालेली ही आर्थिक क्रांती आज शैक्षणिक क्रांतीच्या शिखरावर पोहोचली आहे.
चोपड्यासारख्या ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचेशिक्षण उपलब्ध करून देणे, हे त्यांचे मोठे धाडस आणि दूरदृष्टीच आहे.
• कृतज्ञतेचा सोहळा-वाढदिवस नव्हे, संकल्प दिन..!
आज दादासाहेब वयाचा एक महत्त्वाचा टप्पा पार करत असताना, त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नाही तर पुढच्या ध्येयाची चमक आहे.त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण खान्देशातील जनता एकाच भावनेने नतमस्तक होत आहे
– "असा पितृतुल्य आधारवड आणि मातृस्वरूप माऊली या मातीला लाभणे, हे आमचे परमभाग्य..!"दादासाहेब, तुम्ही केवळ अध्यक्ष नाही, तर तुम्ही आमचा विश्वास आहात. तुमच्या रूपाने आम्हाला एक भक्कम आधारवड मिळाला आहे.तुमच्या कार्याचा हा सुगंध सदैव असाच दशदिशांना दरवळत राहो..! एम. व्ही. पाटील
• मुख्याध्यापक- पंकज प्राथमिक विद्यालय, चोपडा
