राज्यस्तरीय 'इंग्रजी ऑलिम्पियाड' स्पर्धेत पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे यश
चोपडा दि.20(प्रतिनिधी): तालुक्यातील अकुलखेडे येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आपल्या ज्ञानाच्या जोरावर यशाचे शिखर सर केले आहे. 'एल.एफ.डब्ल्यू.' (LFW) संस्थेमार्फत इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या *'इंग्रजी ऑलिम्पियाड'* स्पर्धेत शाळेची विद्यार्थिनी *कु. हेमाद्री भूपेंद्र महाजन हिने महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांक* पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
२५ हजार विद्यार्थ्यांमधून मारली बाजी
इंग्रजी व्याकरणावर आधारित असलेल्या या कठीण स्पर्धेत संपूर्ण राज्यातून सुमारे २५ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. विविध फेऱ्या पार करत विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय सेमी-फायनलपर्यंत धडक मारली होती. यामध्ये *इयत्ता सहावीची प्राची प्रवीण महाजन आणि आठवीची हेमाद्री भूपेंद्र महाजन यांचा समावेश होता.* अंतिम फेरीत हेमाद्रीने आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करत राज्यातून तिसरा क्रमांक मिळवला.
*बक्षिसांचा वर्षाव आणि सत्कार सोहळा*
यशस्वी विद्यार्थिनींसाठी संस्थेमार्फत सुमारे १० हजार रुपयांची बक्षिसे पाठवण्यात आली. आज विद्यालयात पालक आणि शिक्षकांच्या उपस्थितीत या विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला
*हेमाद्री महाजन (राज्य तृतीय): हिला स्टडी टेबल, स्कूल बॅग, वॉटर बॉटल, टिफिन बॉक्स आणि इतर शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.*प्राची महाजन (सेमी-फायनलिस्ट): हिला देखील विशेष शैक्षणिक साहित्याचे संच देऊन प्रोत्साहित करण्यात आले.*
*शिक्षिका दिपावली पाटील यांचा 'ॲक्टिव्ह टीचर' म्हणून गौरव*
या विद्यार्थिनींना इंग्रजी विषयाचे उत्कृष्ट मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका *श्रीमती दिपावली विनायक पाटील यांना संस्थेमार्फत *'ॲक्टिव्ह टीचर'* पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. पी. एस. पाटील सर यांनी दिपावली मॅडम यांच्या मार्गदर्शनाचे आणि कष्टाचे विशेष कौतुक केले.
या यशाबद्दल चहार्डी विद्या प्रसारक मंडळ, अकुलखेडे ग्रामस्थ, शिक्षक वृंद आणि पालकांनी सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
