रोहित मराठे यांची मुंबई लोहमार्ग पोलीस दलात निवड

 रोहित  मराठे  यांची मुंबई लोहमार्ग पोलीस दलात निवड

 चोपडा दि.१८(प्रतिनिधी ) तालुक्यातील घोडगाव येथील प्रगतीशील शेतकरी व छत्रपती पिक संरक्षण सोसायटीचे व्हा.चेअरमन संतोष नाटु मराठे ऊर्फ (बंडु मराठे)  यांचा मोठा मुलगा रोहित संतोष मराठे याची मुंबई लोहमार्ग पोलीस दलात निवड झाली आहे. सर्व सामान्य कुटुंबातील हा मुलगा असून अनेक दिवसांपासून त्याचे प्रयत्न चालु होते, अखेर त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. त्याच्या या निवडीमुळे गावातील व परिसरातील तरुणांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे,  आपलीही कोणत्याही विभागात निवड व्हावी, अशी अपेक्षा धरुन प्रयत्नशील आहेत.

 त्याच्या या निवडीने गावातील मित्र परिवाराने वाजतं रगाजतं मिरवणुक काढली .यावेळी गावातील महिलांनी त्याचं औक्षण केले.

रोहित यांच्या निवडीबद्दल प्रकाश रजाळे, सुतगिरणी संचालक संजय पाटील , विजय पाटील, उध्दव फकिरा पाटील, डॉ.बी.आर.पाटील,किशोर पाटील , सुनिल आनंदराव पाटील पंढरीनाथ पारधी,प्रा.विजयकांत पाटील,चेतन पाटील, पंकज पाटील, प्रभाकर पाटील, रविंद्र गणपुकर,  सुनिल मराठे यांच्या सह गावातील ग्रामस्थ व मित्र परिवाराने स्वागत अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने