गोरक्षकांवर दगडफेक चोपड्यात १५रोजी भव्य जाहीर मोर्चा व व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
चोपडा दि.१४(प्रतिनिधी) : शहरात दिनांक १३ रोजी गोरक्षकांवर झालेल्या अमानुष दगडफेक आणि ७० गोवंश गर्दी चा फायदा घेऊन पसार करण्यात आले. या घटनेचा निषेधार्थ चोपड्यात गोरक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी चोपडा शहरात दि १५ एप्रिल बुधवार रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजेच्या दरम्यान चोपड्या शहरातून भव्य जाहीर मोर्चा काढण्यात येत असून व्यापारी महामंडळातर्फे दुकाने बंद कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
* मोर्चास श्रीराम मंदिर गांधी चौक येथून प्रारंभ होणार आहे . या मोर्चाला चोपडा शहर आणि तालुक्यातील सकल हिंदु समाजाने मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन चोपडा तालुका व्यापारी महामंडळातर्फे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमृतराज सचदेव व सकल हिंदू समाजाने केले आहे.
चोपडा शहरात कडकडीत बंद ठेवण्यात यावा त्यासाठी सर्व व्यापारी बांधवांनी आपले दुकान प्रतिष्ठाने संध्याकाळी पाच वाजेपासून बंद ठेवावीत व एकजुटीने मोर्चात सहभागी व्हावे असे अध्यक्ष अमृतराज सचदेव ,कार्याध्यक्ष दीपक राखेचा महासचिव प्रवीण राखेचा कळविले आहे.
