चोपड्यात दि.१५ रोजी हिंदू संमेलन
चोपडा,दि.१४(प्रतिनिधी)- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षा निमित्त संपूर्ण भारत देशात वस्ती नुसार हिंदू संमेलनाचे आयोजन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येत आहेत. चोपडा तालुक्यात वस्ती आणि गाव स्तरावर हिंदू संमेलनाचे आयोजन स्थानिक समिती गठीत करून होत आहे.
चोपडा शहरातील हिंदू संमेलन समितीच्या वतीने शहरातील ग्रामदैवत श्री आनंदी भवानी मंदिर प्रांगणात हिंदू संमेलन दि. १५ एप्रिल रोजी रात्री साडे सात वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून आशिष भारतवंशी (नागपूर) हे युवा व्याक्याते उपस्थित राहणार आहेत.यावेळी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे ही आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.
