चोपडा आगारात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
चोपडा,दि.१४ (प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारात महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील व संदेश क्षीरसागर यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचे पुजन करुन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय अहीरे यांनी तर पंचशील प्रार्थना व आभार सुदाम करनकाळ यांनी मानले. यावेळी राजेंद्र पारे, रविंद्र वाडे, रुपेश भालेराव, करंदीकर,अशोक बाविस्कर भरत शिरसाठ, रमेश अहीरे,विक्की शिरसाठ, विनोद खजुरे,, सनी शिरसाठ,अजय साळुंखे,अतुल पाटील, पंडीत बाविस्कर,सी पी कोळी, नाना बाविस्कर,दिपक पाटील, भगवान नायदे, दिपक शिरसाठ, गौतम सपकाळे, संदिप तायडे,उमाकांत कोळी, रिजवान सैय्यद, मुन्ना ठाकुर,महेश बिरारी सह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
