अमळनेरच्या 08 ऊसतोड मजुरांची सुटका !
♦️ जन सहास फॉउंडेशन च्या हाकेला जळगाव व पुणे प्रशासनाची दाद
चोपडा,दि.१४(प्रतिनिधी) : ऊसतोडीसाठी काम आहे, असे सांगून पुणे जिल्ह्यात नेलेल्या अमळनेर गावाच्या 08 मजुरांना अन्यच काम देत त्यांना डांबून ठेवल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. मजुरीची रक्कम न देता या मजुरांवर उपासमारीची वेळ आली असताना जन साहस संस्थेने प्रशासनाचा दरवाजा ठोठावला. त्यानुसार जळगाव आणि पुणे जिल्हा प्रशासनाने सुत्रे हलवित या मजुरांना सुखरुपपणे घरी पोहचते केले आहे.
पळासदडे आणि हिंगोणे ता. अमळनेर या गावातील 08 मजुरांना ऊसतोडीच्या कामासाठी दौंड तालुक्यात नेण्यात आले होते. कित्येक दिवसांपासून मजुरांना दौंडसह अन्य गावांमध्ये ऊसतोड व अन्य गुऱ्हाळ काम कामासाठी जुंपण्यात आले. मोबदला मागितल्यावर मात्र धमकावण्यास सुरुवात केली आणि नजरेखाली ठेवत कामगारांची दुचाकी गाडी कामगारांनकडून मालकाने स्वतः च्या ताब्यात घेतली, त्यांच्याकडून मर्जी नसताना इच्छे विरुद्ध काम करून घेण्यात आले.
या प्रवासात एकच मालकांकडे वेगवेगळ्या कामांसाठी जुंपले असताना संदीप हिलाल मोरे व विमलबाई पंडित भिलं या मजुराने होत असलेल्या अन्यायाविषयीची माहिती जन साहस संस्थेचे कामगार हेल्पलाईन क्र 180012011211 ला कळविली. तेव्हा जन साहस संस्थेने पुढाकार घेत जिल्हाधिकारी श्री रोहन घुगे जी , RDC यांच्यासोबत संबंधित विषयी माहिती देण्यात आली व साहेबांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. पुणे जिल्हाधिकारी डॉ.जितेंद्र डुडी यांच्या सहकार्याने महसुल विभाग, कामगार विभाग, पोलिस विभाग पुढील रेस्क्यू कार्यवाहीसाठी आदेश निर्गमित करण्यात आले .
जन साहस संस्थेचे ॲड.विरसेन काजळे,राज्य कामगार सुरक्षा समन्वयक रुबीना सय्यद व बाळासाहेब शिंदे जळगांव जिल्हा समन्वयक निलेश शिंदे, जळगांव क्षेत्र अधिकारी सोनम बिऱ्हाडे, व प्रज्ञा हातोडे पुणे क्षेत्र अधिकारी सागर कलशेट्टी, जन साहस टीम व दौंड तालुका प्रांत अधिकारी रेवणनाथ लबडे यांनी बंधपत्रित कामगार कायद्यानुसार कारवाई करण्याचे आणि बचाव पथक तयार करून कामगारांना सुटका करण्यासाठी रेस्क्यू प्रक्रिया करण्यात आली व त्याकामगारांना SDM कार्यलय मध्ये पंचनाम व जबाब घेऊन सुरक्षित व सुखरूप पणे त्यांना त्याच्या गावी पोह्चवण्यात आले कामगारांच्या पुनर्वसन व शासकीय योजनेबद्दल चर्चा करण्यात आली.
पळासदडे आणि हिंगोणे ता. अमळनेर येथील हिलाल बन्सी मोरे, सुशिलाबाई हिलाल मोरे, सुनील पंडित सोनवणे , भारती सुनील सोनवणे , राकेश हिलाल मोरे , वैष्णवी सुनील सोनवणे, आयुष सुनील सोनवणे, गायत्री सुनील सोनवणे हे मजूर सुखरुपपणे घरी परतले आहेत.

