चोपड्यात कॉंग्रेस कमिटीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

 चोपड्यात कॉंग्रेस कमिटीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

चोपडा दि.१४(प्रतिनिधी)आज दिनांक 14 एप्रिल 2026 वार मंगळवार रोजी सकाळी 09:00 वाजता महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील व डॉ.स्मिताताई संदीप पाटील (सचिव महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा) यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास देखील माल्यार्पण केले.

यावेळी सर्व काँग्रेस कार्यकर्ते यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा नावाचा जयघोष करत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे,शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे,मधुकर बाविस्कर, रमेश शिंदे,दिलीप साळुंखे,माजी तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील,तापी सूतगिरणी संचालक राजेंद्र पाटील,नगरसेवक रमाकांत ठाकूर,नगरसेवक वंदना पाटील,नगरसेवक अमोल पाटील,नगरसेवक वंदना बाविस्कर,अशोक साळुंखे, एम बी हांडे ,माजी नगरसेवक फातिमा पठाण, शांताराम लोहार, यशवंत खैरनार,धनंजय पाटील,शशिकांत साळुंखे,सुधाकर बाविस्कर, रमाकांत सोनवणे,अनिल सोनवणे,मोहन पाटील ,महेंद्र शिरसाठ, हमीद शेख,सोमाणी सर,प्रताप सोनवणे,सुमित पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने