.... तरीही संघ हिंदू समाजाच्या संघटनासाठीच झटला असता - सुहास भगत
चोपडा,दि.११(प्रतिनिधी) - संघ स्वयंसेवकांनी फाळणीच्या काळात सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध व पंजाब प्रांतात प्रचारकांच्या मदतीने खूप मोठे योगदान देवून हिंदू समाजाला भारतात आणले.सर्व सोडून आलेल्या हिंदू बांधवांना मदतीचा हात त्याकाळात समाजाच्या सहाय्याने समाजाने दिला.भारताची फाळणी धर्माधारीत झाली असतांना भारतात फक्त हिंदूच राहिले असते तरी रा.स्व.संघाने हिंदूंच्या संघटनासाठीच काम केले असते असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र सहसेवा प्रमुख सुहास भगत यांनी व्यक्त केले.ते चोपडा येथील समर्थ पॅलेस येथे आयोजित जन संगोष्ठी कार्यक्रमात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर जिल्हा संघ चालक डॉ.मनोज साळुंखे उपस्थित होते.
आपल्या मनोगतात श्री.भगत पुढे म्हणाले की, संघ शंभराव्या वर्षात पदार्पण आणि कार्यरत आहे.आजही संघाच्या संस्थापकांना ओळखण्यापेक्षा लोकं संघाला ओळखातात हेच संघाचे खरे यश आहे.संघातील कार्यरत स्वयंसेवक असेल अथवा मोठा पदाधिकारी हा स्वतःसाठी नव्हे तर देशासाठी,धर्मासाठी,धर्म संघटनेसाठी काम करतो त्यामुळे देश,धर्म मोठा व्हावा हीच संघाची भूमिका आजही कायम आहे.
संघाच्या स्थापने बद्दल बोलतांना सांगितले की,संघ शंभराव्या वर्षात पदार्पण आणि कार्यरत आहे.वर्ष १९२५ ला दसऱ्याच्या दिवशी नागपुरात स्थापना झाली.डॉ.हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली.आजच्या काळात कोणताही संघटन तयार होते.त्यात कार्यालय,पदाधिकारी,आधी नंतर संघटन होते.पण संघाची स्थापना झाली त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव देखील निश्चित नव्हते.आठ दहा लोकांना एकत्रित करुन हेडगेवार यांनी पहिली शाखा नागपुरात सुरू केली.आज ऎशी हजार शाखांच्या वर शाखा कार्यरत आहेत.संघाचे काम हिंदू धर्माचे संघटन हेच आहे.संघ थेट राजकारणात तेंव्हाही नव्हता आजही नाही.आता युवा पिढीने,समाजाने नेतृत्व हातात घ्यावे हीच संघाची पुढची भूमिका आहे.भारत विश्वगुरू बनण्यासाठी हीच भूमिका महत्वाची ठरणार आहे.
अनुशाक्षित समाजच देशाला पुढे घेऊन जाऊ शकतो कुटुंब जितके मजबूत असतील तितकाच देश मजबूत राहील.कुटुंब आमची पहिली शाळा आहे.आपण परिवारात कधी एकत्र बसतो आणि बसताना कोणती चर्चा करतो ? चर्चा करतो की मोबाईल बघतो.आजच्या मुलांना शब्द सुचत नाहीत,बोलता येत नाही मोबाईलवर टाईप करता येते पण बोलता येत नाही.मोबाईल ॲप वर आपण आधारित जीवन जगतो आहोत.आपल्या आजू बाजूला मंदिरे नद्या कोणत्या हे आपल्याला माहीत नाही.मॅप आणि ऍप ने माणसाला लुळे बनवले आहे.
आम्ही शिक्षित झालो पण दुसऱ्यांची नोकरी करतो स्वतःचे उद्योग धंदे बंद केलेत.स्वावलंबन आणि आर्थिक स्वातंत्र्य मोठे आहे त्याला आपण जपले पाहिजे.असेही परखड मत सुहास भगत यांनी यावेळी व्यक्त केले.संघ चर्तुवर्णीय जाती व्यवस्था मानत नसून सर्व भारतात राहणार हिंदू ही संघाची प्रारंभापासून भुमिका असल्याचे भगत यांनी सांगितले.
प्रारंभी विवेक बाविस्कर यांनी सामुहिक म्हटलेल्या वंदे मातरमने कार्यक्रमाला सुरुवात झाली. सूत्रसंचलन कुशल गुजराथी यांनी केले.तर परिचय हरिष माळी यांनी करुन दिला.यावेळी मोठ्या संख्येने विविध क्षेत्रात प्रकर्षाने कार्यरत असलेले हिंदू बंधू भगिनी उपस्थित होते.
