चोपड्यात जागतिक होमियोपॅथिक दिवस साजरा
चोपडा,दि. 11 (प्रतिनिधी): फादर ऑफ होमिओपॅथिक सिस्टिम ऑफ मेडिसिन आणि होमिओपॅथीचे जनक डॉ सॅम्युअल हॅनीमन यांचा जन्मदिवस व जागतिक होमिओपॅथिक दिवस चोपडा शहरातील डॉ करंदीकर होमियोपॅथिक क्लिनिक मध्ये साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विधान सभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी होते.त्यांच्याहस्ते द्वीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी डॉ हॅनीमन यांच्या कारकीर्द व होमियोपॅथी वर अनेकांनी मते मांडली.
कार्यक्रमाला डॉ अजय करंदीकर, राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे,जैन ट्रेडिंगचे संचालक दिनेश जैन, सुधीर बुक डेपोचेे संचालक सुधीर जैन,डॉ अतुल पाटील,डॉ सचिन काटे ,डॉ महेश लांडे,डॉ भूषण सोनवणे,डॉ परेशदादा टिल्लू ,प्रशांत पाटील, सचिन सुतार व विजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
