आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत फडकला प्रतापचा झेंडा

 आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत फडकला प्रतापचा झेंडा                                 

चोपडा दि.११(प्रतिनिधी): रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई आयोजित, आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा प्रताप विद्या मंदिर चोपडा येथील केंद्रावर  फेब्रुवारी2026 संपन्न झाली होती.एकूण ९ कला प्रकारात १ली ते १२वी च्या ६७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या  स्पर्धेत सहभागी झालेले सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिके मिळाले . त्यात प्रामुख्याने 26 इंटरनॅशनल ट्रॉफी 30 इंटरनॅशनल आकर्षक मेडल 11 कन्सिलेशन प्राईस अशी विविध बक्षीस विद्यार्थ्यांना प्राप्त झाले. त्याचप्रमाणे अनन्या पवन पाटील या विद्यार्थिनीला  A++ श्रेणी- लॅपटॉप ,  पवन महेश लोहार , अविका कमलेश गायकवाड , काव्या दीपक पाटील   या विद्यार्थ्यांना A+ श्रेणी मिळवून आकर्षक   स्मृतीचिन्ह, विशेष पारितोषिक प्रमाणपत्र मिळाले  .

या पारितोषिक व पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रम  प्रसंगी सेवानिवृत्त कलाशिक्षक एम टी महाले, कलाशिक्षक सुनील पाटील,  कलाशिक्षक पी डी शिंदे हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले. मुख्याध्यापक श्रीमती माधुरी पाटील, उपमुख्याध्यापक  अतुल भट, उपप्राचार्य  जे एस शेलार, पर्यवेक्षक  एस व्ही करमरकर , पंकज नागपुरे  नवनीत राजपूत , कलाशिक्षक  कमलेश गायकवाड ,संगीत शिक्षक पी बी कोळी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली. 

या स्पर्धेत स्केचिंग, रंगभरण, कोलाज,मुद्राचित्र ,हस्ताक्षर, टॅटू, कार्टून, ग्रीटिंग कार्ड , फोटोग्राफी आदी कलाप्रकारात विद्यार्थ्यांनी  यश संपादन केले संपूर्ण  जगात भारतासह रशिया ,दुबई, भूटान, टंजानिया या देशांमध्ये  एकाच वेळेस ही स्पर्धा घेण्यात आली होती. या दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन रंगोत्सव सेलिब्रेशनचे इव्हेंट डायरेक्टर व कलाशिक्षक  कमलेश ए. गायकवाड  यांनी केले.या  यशाबद्दल संस्थेतील सर्व घटकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  किरण बी पाटील यांनी केले. तर इशस्तवन संगीतशिक्षक पी.बी कोळी यांनी सादर केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ,राजेंद्र शिरसाट, राहुल महाले, यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना मिळालेले पुरस्कार पाहून पालकांना आनंद व समाधान लाभले.   कलाशिक्षक कमलेश गायकवाड सर यांनी  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने