विवेकानंद विद्यालयाची कु.स्वरा हरताळकर इंग्लिश ग्रामर अॅडव्हान्स परिक्षेत राज्यातून सर्वप्रथम..

 

विवेकानंद विद्यालयाची कु.स्वरा विनित हरताळकर इंग्लिश ग्रामर अॅडव्हान्स परिक्षेत राज्यातून सर्वप्रथम..

चोपडा दि.12(प्रतिनिधी)पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित इंग्लिश ग्रामर ऍडव्हान्स फेब्रुवारी 2026 या राज्यस्तरीय परीक्षेत विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थिनी कु. स्वरा विनीत हडताळकर हिने शेकडा 78 टक्के  गुण मिळवत राज्यातून प्रथम येण्याच्या मान मिळविला आहे.
कुमारी हरताळकर स्वरा हरताळकर ही इयत्ता दहावी वर्गात शिकत असून तिने टिळक विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत 100पैकी 78गुण मिळवत राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. याआधीही तिने विविध स्पर्धांमध्ये नैपुण्य दाखवत तालुका, जिल्ह्यात व राज्यात चमकण्यात  कसर सोडलेली नाही . नंबर एक ही तिची छबी असून  हवाई सफरचा मान तिने पटकाविला होता.तिला तिच्या यशाबद्दल प्रसिद्ध धन्वंतरी विवेकानंद हॉस्पिटलचे संचालक तथा आजोबा डॉ.विकासकाका हरताळकर ,वडिल डॉ.विनित हरताळकर व काका डॉ.अमित हरताळकर, डॉ.विकास पोतदार व शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभते. तिच्या यशाबद्दल शाळेचे चेअरमन घनश्याम अग्रवाल,सचिव अॅड जैन , संस्थेचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी विश्वस्त मुख्याध्यापक शिक्षक वृंद व विवेकानंद परिवारातर्फे तिचे गोड कौतुक करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने