आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांनी "चोपडा शहराचा झपाट्याने कायापालट होतोय.. बहिणाबाई मार्ट ची संकल्पना महिलांना लाभदायक पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन
♦️साडे पाच कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन .. बहिणाबाई व्यापार संकुल,उद्यानांचा समावेश
चोपडा दि.१२(प्रतिनिधी): चोपडा नगरपालिका ही आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात देऊन नागरिकांनी खूप मोठे काम केले आहे.आता शहराचा सर्वांगीण विकास झपाट्याने साधला जाणार आहे त्याची मुहूर्तमेढ आताच रोवली गेल्याचे चित्र तुमच्यासमोर आहे."हम बोलते नहीं करके दिखाते है "असा डाॕयलाग मारत उपस्थितांमध्ये हशा पिकविला.लाडक्या बहिणींना उद्योग देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. काही पुरुष बेईमान असू शकतात, पण लाडक्या बहिणी कधीच बेईमान नसतात. महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जळगाव जिल्ह्यात राबवलेली बहिणाबाई मार्टची संकल्पना आता राज्य सरकारने स्वीकारली असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
ते आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामांच्या भूमीपूजनप्रसंगी बोलतं होते.
ना.श्री. गुलाबरावजी पाटील यांच्या वरदहस्ते साडे पाच कोटी रुपयांचे विकास कामांचे भूमिपूजन झाले.
या विकास कामात चोपडा शहरात बहिणाई मार्ट व्यापारी संकुल बांधकाम करणे.२.५० कोटी रु. (दोन कोटी पन्नास लाख रु.),
चोपडा शहरातील बोरोले नगर २ व पंडीत कॉलनी वरील खुल्या जागेवर उद्यान विकसीत करणे.२.०० कोटी रु. (दोन कोटी रुपये),व
चोपडा शहरातील खुल्या जागेवर नमो उद्यान विकसीत करणे.१.०० कोटी रु. (एक कोटी रुपये) अशा एकुण ५ कोटी ५० लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन झाले.यामुळे आता शहराचा चेहरामोहरा बदलणास हातभार लागणार आहे.
आ.चंद्रकांत सोनवणे यांनीही आपण सीए असाल, पण आम्ही विकासात सीए आहोत, अशा शब्दांत विरोधकांचा समाचार घेतला. तसेच, धनगर, माळी मुस्लिम समाजाच्या सभागृहासाठी प्रत्येकी दोन कोटी रुपये मंजूर केल्याचे जाहीर केले. तसेच शिवसेनेच्या सत्तेमुळे पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली असून, आता ४ दिवसांआड पाणी मिळत असल्याचे सांगितले.
यावेळी माजी आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे,सभापती नरेंद्र पाटील, माजी पं.स
सभापती एम.व्ही.पाटील, ए.के.गंभीर, उपनगराध्यक्ष पंकज बोरोलें, नगराध्यक्षा सौ.नम्रता पाटील, चोपडा कॉलेजच्या सचिव डॉ.स्मिता संदीप पाटील, नंदकिशोर सांगोरे, माजी नगरसेवक प्रकाश राजपूत,उद्योजक रविंद्र पाटील,गटनेता पियुष चौधरी, मुख्याधिकारी रामनिवास झंवर, गटनेते रमाकांत ठाकूर, बांधकाम सभापती हुसेन खाँ अय्युब खॉं पठाण, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती अमोल साहेबराव पाटील, स्वच्छता वैद्यक आणि आरोग्य समिती सभापती रमेश ग्यानोबा शिंदे, पाणीपुरवठा व जल निस्सारण समिती सभापती किशोर रघुनाथ चौधरी, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. देवयानी पवन माळी , नगरसेवक ईश्वर अलकारी,नगरसेवक हनीफशेठ सत्तार, नगरसेविका रुकसारबी सऊद बागवान, नगरसेवक राजनंदिनी पाटील, नगरसेविका दीपाली चव्हाण, नगरसेवक दीपक पाटील यांच्यासह नगरसेवक प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक, सामाजिक कार्यकर्ते , सेना पदाधिकारी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रास्ताविक मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी व सुत्र संचालन आर.एस.पाटील यांनी तर आभारप्रदर्शन नगर अभियंता डिगंबर वाघ यांनी केले.
