चोपडा नगरपालिकेचा अतिक्रमणावर हातोडा १८ दुकाने भुईसपाट..कडक उन्हाच्या तडाख्यातही मुख्याधिकारी रामनिवास झंवर रस्त्यावर

 चोपडा नगरपालिकेचा अतिक्रमणावर हातोडा १८ दुकाने भुईसपाट..कडक उन्हाच्या तडाख्यातही मुख्याधिकारी रामनिवास झंवर रस्त्यावर 

चोपडा दि.12(प्रतिनिधी)नगर पालिकेचे  मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या मार्गदर्शनात नगर अभियंता दिगंबर वाघ यांनी नगर पालिकेच्या मागील भागातील 18 अतिक्रमित दुकाने निष्कासित करून  अतिक्रमणधारकांना जबर चपराक दिली आहे.शहरात मुजोरी करत रस्त्या रस्त्यावर अतिक्रमणधारकांची फौज वाढली असून "अपना बाप का राज है"या तोऱ्यात वावरणारे बहाद्दरांची संख्या फोफावली आहे.शासनाच्या जागेला कोणी वारस नसल्याचे समजून नगरपालिका मंत्रालयात फोन करून दबाव तंत्राने खतपाणी घालणाऱ्यांची संख्याही कमी नाही त्यामुळे अशा लालचींच्या मनमानीला मुख्याधिकारी  साहेबांनी योग्य पाऊल उचलत अतिक्रमणाविरुद्ध चांगलाच सपाटा लावल्याने शहरवासीयांनी या उत्तम कार्याचे कौतुक केले आहे.

 विशेष म्हणजे नगरपालिकेच्या आवाहनाला काही अतिक्रमण धारक स्वतःहून पुढे येत अतिक्रमण काढून घेण्यास राजी  झाले आहेत. त्यांना न.पा.प्रशासनाच्या  टीमने  प्रेमभावाने मदतीचा हात दिला आहे.

या धडक मोहीमेत  सहायक नगर रचनाकार चेतन अहिरराव ,विद्युत अभियंता प्रमोद पाटील , कर निरीक्षक प्रणव पाटील, अतिक्रमण विभागाचे आत्माराम बाविस्कर,स्वच्छता निरीक्षक जयेश भोंगे ,लेखापाल मयूर शर्मा , उपमुख्याधिकारी संजय मिसर व इतर विभातील सर्व कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी  मेहनत घेत आहेत. या मोहिमेला गती देण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नगरवासियांतून उमटत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने