प्रताप विद्या मंदिराच्या माजी विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेत सुयश ... रोहित संदिप बडगुजर टॅक्स असिस्टंट पदावर नेमणूक
चोपडा दि.१२(प्रतिनिधी) : प्रताप विद्या मंदिरात चा सन 2017- 18 चा माजी गुणवंत विद्यार्थी चि. रोहित संदिप बडगुजर याने स्पर्धा परिक्षेत जोरदार यश संपादित करीत Tax Assistient पदावर नेमणूक मिळवली आहे.SSC - CGL परीक्षेत उत्तुंग यश संपादित केल्याने त्याचा पालकांसमवेत विद्यालयाने आज येथे सत्कार केला. संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर यांनी चि रोहित ला पेढा भरविला व शाल बुके देवून यथोचित गौरव करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व शाळेच्या संपर्कात राहण्याचे आवाहन केले .
या प्रसंगी मुख्याध्यापक श्रीमती माधुरी पाटील, उपमुख्याध्यापक श्री अतुल भट, समन्वयक श्री गोविंदभाई गुजराथी , पर्यवेक्षक श्री पंकज नागपुरे व दुपार विभागातील शिक्षकवृंद उपस्थित होते .
छोटेखानी कार्यक्रमात श्री विजय गोसावी सरांनी चि रोहित बडगुजरच्या प्रगतीचा भाग स्पष्ट केला . श्री संदिप बडगुजर यांनी आपल्या मुलाच्या प्रगतीत शाळेच्या शिक्षकांच्या कार्याचा उल्लेख करत गौरवोद्गार काढले . आपल्याच शाळेत होणाऱ्या छोटेखानी सत्काराचा विशेष आनंद चि रोहितच्या चेहऱ्यावर दिसून येत होता . यानंतर चि रोहित उपस्थित शिक्षकांशी संवाद साधताना शाळेच्या आठवणीत रमल्याचे दिसून आले .
