यशोधन चॅरीटेबल ट्रस्ट व यशोधन हाॅस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने लासुला मोफत दंत व नेत्ररोग निदान व तपासणी शिबीर संपन्न
लासूर ता.चोपडा दि.४ (वार्ताहर)येथे यशोधन चॅरीटेबल ट्रस्ट व यशोधन हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दंत व नेत्ररोग निदान व तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या वेळी डॉ राहुल पाटील यांनी शिबीराबाबतीत माहिती देताना सांगितले की यशोधन हाॅस्पिटल 25 वर्षापुर्वी सूरु करण्यात आले होते हे रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असल्याने या संपूर्ण वर्षभर ठीकठीकाणी मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच दंत शस्त्रक्रिया साठी रूग्णांना पन्नास टक्के सवलतीच्या दरात उपचार करण्यात येणार आहेत
यावेळी लासूरचे उपसरपंच अनिल पाटील, क्षत्रिय माळी समाजाचे अध्यक्ष ए.के.गंभीरसर, डॉ राजेंद्र महाजन, उपेन्द्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी लासूर चे लोकनियुक्त सरपंच नर्मदा बाई भिल, डॉ रमेश कोठारी, डॉ अशोक पाटील, डॉ.गिरासे, दिनेश वाघ, पोलिस पाटील जितेंद्र पाटील,माजी सरपंच देविलाल बाविस्कर,किशिप्र.मंडळाचे सचिव विक्रम माळी, शिवाजी वाघ, प्रभाकर पाटील,भिकन पाटील पत्रकार दिलीप पालीवाल डॉ तृप्ती पाटील, डॉ महेश्विता चौधरी, यांच्या सह सर्व संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच आशा वर्कर भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
