सी. बी. निकुंभ विद्यालयात "हेल्थ मेला" चे आयोजन

 सी. बी. निकुंभ विद्यालयात "हेल्थ मेला" चे आयोजन

चोपडा,दि.२९(प्रतिनिधी ) तालुक्यातील घोडगांव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सी. बी. निकुंभ माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात महाराष्ट्र शासन व सलाम बॉम्बे फॉउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शिक्षण विभाग व आरोग्य विभाग अंतर्गत राज्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थी सहभागाने समिती तयार करून विविध उपक्रम घेतले जात आहेत. या आरोग्य मेळाव्यात मास्टर ट्रेनर,विज्ञान शिक्षिका एम.ए.जैन यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजाला स्वच्छता,आरोग्य, तंबाखू मुक्ती व व्यसनमुक्ती  याविषयी माहिती देऊन जनजागृती करणे, मेळावे घेणे, नाटिका सादर करणे अशा विविध उपक्रमांची माहिती दिली.

या आरोग्य मेळाव्यात हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले तसेच फास्ट फूड खाण्याचे दुष्परिणाम,योग्य पोषण मिळण्यासाठी आहार कसा असला पाहिजे यासाठीची माहिती दुर्गेश शिरसाठ,चेतन विनोद कोळी,चेतन जगदीश कोळी,भावेश पारधी या इ.७ वीतील विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. या उपक्रमांतर्गत परिसरातील विविध गावात आरोग्य,स्वच्छता, व व्यसनमुक्ती यासाठी विद्यार्थी समितीकडून आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

 याप्रसंगी घोडगांवचे पोलीस पाटील प्रभाकर सोनवणे,आरोग्य सेविका निकिता सोनवणे,आशा वर्कर सुवर्णा कोळी,कल्पना पाटील,कल्पना कुंभार,अंगणवाडी सेविका संगिता पाटील,कुमुदिनी तायडे, हिराबाई शिंदे, प्रतिभा सोनार यांच्यासह विद्यालयातील मुख्याध्यापक आर. एम. चौधरी,पर्यवेक्षक व्ही. पी. पाटील यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने