अडावद येथे शा. ये. महाजन विद्यालयात महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन
अडावद ता. चोपडा दि.२९(प्रतिनिधी) येथील श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित शामराव येसो महाजन विद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १३५ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
२९ रोजी दुपारी चार वाजता शाळेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर.के. पिंपरे हे होते. सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयाचे शिक्षक व्हि. एम. महाजन यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर विद्यार्थ्यां सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांनी घालून दिलेल्या आदेशावर जीवन व्यतीत करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपशिक्षक एन. ए. महाजन, व्हि. एम. महाजन, एम.एन.माळी, पि.एस. पवार, पि.आर. माळी सी.एस. महाजन, ईश्वर मिस्तरी, रवींद्र माजा यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पि.आर. माळी यांनी व्यक्त केले.
