प्रभाग क्रमांक ५ मध्ये कमळ व घड्याळाचा जोर कायम.. आमचा विजय पक्का असल्याचा उमेदवार वसंत गोकुळ पवार यांचा दावा
चोपडा दि.२८(प्रतिनिधी): चोपडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 भाजपा व राष्ट्रवादी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सौ. साधनाताई नितीन चौधरी, प्रभाग पाच ५ब चे अधिकृत उमेदवार वसंत गोकुळ पवार यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असून मतदारांनी आपल्याला नंबर एकची पसंती दिली असल्याने आपला विजय पक्का असल्याचा दावा उमेदवार वसंत गोकुळ पवार यांनी केला आहे.
या प्रभागातील नागरिक जागरूक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर विश्वास ठेवणारे आहेत.राज्यात देवेंद्र फडणवीस व ना.अजित दादा पवार यांना मानणारी आहे त्यामुळे लाडक्या बहिणी आमच्या सोबतीला आहेत .शिवाय आम्ही गेल्या काळात बरीचशी सामाजिक कामे पार पाडली असून आता प्रभागात उरली सुरली कामेही आम्ही तडीस नेऊ अशी आशा मतदारांना असल्याने प्रभागात कमळ व घड्याळाला नंबर एकची पसंती असल्याचा दावा श्री.पवार यांनी केला आहे
सानेगुरुजी वसाहत, विवेकानंद नगर,एसटी कॉलनी,रामनगर,,महावीर नगर, बालाजी नगर, आदर्श नगर परिसरात प्रचारा दरम्यान महिला भगिनींनीआमचे मत तुम्हालाच असून तुम्ही प्रचंड मतांनी निवडून याल अशी खात्री दिल्याने नगरपालिकेवर भाजप -राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल असा दावा केला आहे.
