चोपडा शहर पोलीस स्टेशन कडील तीन सराईत गुन्हेगार तडीपार ..

 

चोपडा शहर पोलीस स्टेशन कडील तीन सराईत गुन्हेगार तडीपार .. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी


चोपडा दि.२८(प्रतिनिधी) जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. महेश्वर रेड्डी साहेब  यांनी सर्व पोलीस स्टेशन यांना जिल्ह्यातील आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शांततेत पार पाडाव्या यासाठी सराईत गुन्हेगार यांचेवर कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.त्यानुसार चोपडा शहर पोलीस स्टेशनने  महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1) (अ) प्रमाणे चोपडा तालुक्यातील तीन गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तरुणांवर मर्यादीत कालावधी करीता हद्दपारीची  कारवाई करून  चोपडा तालुक्यासह तसेच जळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात केलेला आहे.

ही कारवाई  भैय्या विजय लोटन पाटील(रा. बोरोले नगर नंबर 2 चोपडा) ,संग्राम शामसिंग परदेशी राह. (हरेश्वर  कॉलनी चोपडा),तुळशिदास रविंद्र पाटील (रा. नागलवाडी ता. चोपडा) यांच्यावर करण्यात आली असून सदर आरोपीतां विरोधात पोलिसात  धार्मिक भावना दुखावणे तसेच जातीय तेढ निर्माण करणे, खुनाचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा करणे ,प्राणी संरक्षण अधि. अंतर्गत गुन्हा अशा प्रकारे गुन्हे दाखल आहेत

वरील तिनही आरोपीतांविरुध्द दाखल गुन्ह्याचे संपुर्ण विवरणासह मा. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अमळनेर भाग अमळनेर यांचे कडे सदर इसमांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. त्या अनुशंगाने सदर इसमांविरुध्द तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे.

सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन त्यावर सुनावणी घेवुन मा. मा.उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अमळनेर भाग अमळनेर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1) (अ) प्रमाणे प्राप्त अधिकाराचा वापर करीत सदर इसमांना 03 महिने जळगाव जिल्ह्यातुन हद्दपार केले बाबतचे आदेश निर्गमित केलेले आहे

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे अनुशंगाने वरील तीनही इसम चोपडा शहरात कोठेही दिसुन आल्सास सदर बाबतची माहिती चोपडा शहर पोलीस स्टेशन कडील अधिकारी अंमलदार यांना कळविणे बाबत मा.पो.नि. मधुकर साळवे यांनी जनतेला आवाहन केलेले आहे. माहिती देणा-राचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने