महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासह रस्ते, दिवाबत्ती ,आरोग्य, स्वच्छता पाणी समस्या सोडवण्यास कटीबद्ध राहिन.. प्रभाग क्रमांक ६ चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सौ दिपाली विनोद चव्हाण यांची ग्वाही ..
चोपडा दि.२८(प्रतिनिधी)शासनाच्या विविध योजना असल्या तरी त्या जनतेपर्यंत पोहोचत नाही मात्र प्रभागातील नागरिकांनी आपल्याला संधी दिलास या सर्व योजनांचा प्रसार करून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील.त्याचप्रमाणे आमदार प्राध्यापक चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग परिसरातील रस्ते, दिवाबत्ती ,गटार , स्वच्छता, आरोग्य समस्यांवर लक्ष केंद्रित करून महिला वर्गास वैयक्तिक योजनांचाही लाभ मिळवून देण्यासाठी कटीबद्ध राहील अशी ग्वाही प्रभाग क्रमांक ६ च्या शिवसेनेच्या उमेदवार सौ. दिपाली विनोद चव्हाण यांनी दिली.
त्या आपल्या कार्यकर्त्यांसमवेत प्रभागातील मतदारांच्या प्रत्यक्ष दारी जाऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत मतदारांनी संधी दिल्यास निश्चितच प्रभागाच्या चौफेर विकास करू तसेच मागील काळात प्रभागात कुठलेही कामे झाले नसून ती उणीव भरून काढण्यासाठी मी वचनबद्ध राहील असे सांगत त्यांनी सर्व प्रभाग पिंजून काढला.
विजय आपलाच होणार
आमदार प्राध्यापक चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या शहरातील होणाऱ्या भरघोस कामांची पावती आमच्या सोबत असून जनतेचा आमच्यावरील विश्वास व आशीर्वाद मिळत असल्याने त्याचे फलित म्हणून आमचा विजय पक्का आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
