मराठे गावात आगीत दोन झोपड्या जळून खाक.. आदिवासी कुटुंबे उघड्यावर.. तातडीने शासकीय मदतीची अपेक्षा?
गलंगी,ता.चोपडा दि.८(प्रतिनिधी) चोपडा तालुक्यातील मराठे गावातील दोन झोपड्या जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी साधारणपणे ११:०० वाजेच्या सुमारा घडली.घटनेत गरिब आदिवासी कुटूंबातील दोन झोपड्या जळाल्याने संसारोपयोगी वस्तू, घरकूलाचे ७० हजार रूपयाचा चेक, टिव्ही, एका महिलेच्या डिलीव्हरी साठी जवळ पास ३५ ते ४० हजार रूपये रोख रक्कम, धान्य, व इतर साहित्य पूर्ण पुणे लाख झाले असून दोन्ही कुटूंब उघड्यावर आले आहेत. अंगावरील कपडे व्यतिरिक्त काहीही शिल्लक राहिले नसल्यामुळे संसार उभा करायचा कसा? असा यक्षप्रश्न उभा राहिला आहे.
दरम्यान हि आग कश्या मुळे लागली याची माहिती घेतली असता. चुलीतले सरपण हे पूर्णपणे विझवले नाही. अनं त्या दोन घरातील कुटुंब हे शेतीकामासाठी शेतात गेले असता त्यांच्या पश्चात हि घटना घडली. यामुळे मराठे-गणपूर ग्राम पंचायत चे लोकनियुक्त सरपंच भुषण गायकवाड, तलाठी दिलीप बारेला, यांनी घटनास्थळी धाव घेतली असता जळालेल्या दोन झोपड्या चा पंचनामा केला आहे. साधारणपणे साडे तीन ते चार लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
चंद्रकांत भिल्ल, सुरेश भिल्ल असे नुकसान झालेल्यां घरमालक यांची नावे समोर आली आहेत. आगीचे रूप एवढे भयानक होते की संसाराचे भांडी, व इतर साहित्य हे अक्षरश जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोन कुटूंबातील नागरिकांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.
.....................................................................
संसार उध्वस्त शासकीय मदत तात्काळ मिळावी
आजच्या परिस्थितीत आमच्याकडे कपडे तर नाहीत पण कुठलंही आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड वगैरे वगैरे सर्वच जळाल्यामुळे हातात काही शिल्लक राहिले नाही. आम्ही आदिवासी कुटुंब असल्यामुळे आम्हाला गरीबाच्या संसार उभ्या करण्यासाठी शासनाने काहीतरी मदत करावी असे मी हात जोडून विनंती करत आहे
सुरेश भिल्ल, नुकसान ग्रस्त नागरिक,मराठे, ता. चोपडा
