चोपडा न.प.निवडणुक रणधुमाळी..! शिवसेना शिंदे गट व भाजप पक्षातर्फे दिग्गजांचा प्रवेश .. उद्या अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी गर्दी होण्याची शक्यता..!

 

चोपडा न.प.निवडणुक रणधुमाळी..! शिवसेना शिंदे गट व भाजप पक्षातर्फे दिग्गजांचा प्रवेश .. उद्या अर्ज दाखल करण्याच्या  पहिल्याच दिवशी  गर्दी  होण्याची शक्यता..!

चोपडा दि.९(प्रतिनिधी) :-चोपडा नगरपरिषद निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांमार्फत वेगवेगळ्या कार्यकर्त्यांचे जोरदार फळी तयार करण्याचे प्रयत्न सुरू असून आज,दि.०९/११/२०२५ रोजी शिवसेना शिंदे गटात व भारतीय जनता पक्षातही मातब्बर कार्यकत्यांचा प्रवेश सोहळा पार पडला.राजकिय उलथापालथ जोरदारपणे सुरू असून उद्या फार्म भरण्याच्या पहिल्याच दिवशी कोण कोण प्रवेश अर्ज भरतो हे चेहरे पाहावयास मिळणार आहे.यंदा मात्र  हवेसे नवश्यांचीही गर्दी वाढण्याचे संकेत आहेत.

शिंदे गटात पंकज बोरोले यांच्यासह दिग्गजांचा प्रवेश
कार्यसम्राट आमदार प्रा. अण्णासाहेब श्री चंद्रकांत बळीराम सोनवणे व माजी आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चोपडा शिवसेना शिंदे गटात  अनेक कार्यकर्त्यांनी आज जाहीर प्रवेश केला.त्यात  पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे सर्वेसर्वा कार्यक्षम नूतन अध्यक्ष श्री. भैय्यासाहेब पंकज  सुरेश बोरोले यांच्यासह  दिपक भगवंतराव पाटील (अध्यक्ष चोपडा मेडीकल असो.),(माजी नगरसेवक
श्री. सुरेश मगन बडगुजर,बापु डेअरीचे संचालक श्री.बापु महाजन,ताहेर खान  यांचा समावेश आहे .

भाजपात संध्या महाजन यांचा प्रवेश

भाजपा पक्षात आजही माजी नगरसेविका संध्याताई नरेश महाजन व आवडत असोसिएशनचे कार्यकर्ते नरेश महाजन यांनी प्रवेश केला.यावेळी शहर अध्यक्ष नरेंद्र पाटिल ,रोहित दादा निकम, जिला महामंत्री राकेश दादा पाटिल, कांतिलाल पाटिल, ग्रामीण अध्यक्ष जिला उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटिल, जीवन भाऊ चौधरी, अशोक शिम्पी, देवदत्त वैद्य आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने