आदिवासी जनजाती समाज हिंदू संस्कृती व परंपरेचा पुरातन काळापासून वारसदार - प्रकाश गेडाम
चोपडा,दि.९(प्रतिनिधी) - जनजाती समाजाचा इतिहास प्रेरणादायी व गौरवशाली असुन वैविध्यपूर्ण संस्कृतीने नटलेला आहे. परंतु आपल्या समाजात देश विघातक लोकांकडून कृत्रिमरित्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आव्हाने निर्माण करण्यात येत आहेत. या आव्हानांचे स्वरूप जाणून घेऊन त्या संबंधी वैचारिक लढ्याची दिशा ठरविण्यासाठी जनजाती समाजातील विचारवंत बांधवानी एकत्र येऊन वैचारीक मंथन करण्याची गरज आहे.आदिवासी बांधव हिंदु संस्कृती व परंपरेचे पुरातन काळापासूनचे वारसदार आहेत.ही संस्कृती टिकली पाहीजे असे प्रतिपादन प्रकाश गेडाम यांनी केले.ते भगवान बिरसा मुंडा सार्धशती (१५० वी जयंती) निमित्त चेतना परिषदेत बोलत होते.
चोपडा शहरा जवळील खेतेश्र्वर हॅालमध्ये चेतना परिषद पार पडली त्यात ते बोलत होते.
प्रारंभी भगिनी मंडळ संचलित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक गीत सादर केले.तसेच भगवान बिरसा मुंडासे यांच्या प्रतिमेचे पुजन व दीप प्रज्वलन अतिथींचे हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक दत्ता पावरा यांनी केले.तर परिचय दिनेश बारेला यांनी करुन दिला.
प्रथम सत्र जनजाती गौरवशाली इतिहास, परंपरा व विकार या विषयी चेतना परिषदेचे प्रांत संयोजक प्रकाश गेडाम यांनी मार्गदर्शन केले.तर दुस-या सत्रात धर्ती के आबा भगवान बिरसा मंुडा यांचे चरित्र देवगिरी प्रांत सहचिव काशिराम बारेला यांनी मांडले.काशिराम बारेला,तिस-या सत्रात -जनजाती अस्मिता व अस्तित्व याविषयी सह हितरक्षा प्रमुख पश्चिम क्षेत्र यांनी युवराज लांडे यांनी मनोगत व्यक्त केले.या चेतना परिषदेला जळगाव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर आदिवासी बंधू भगिनी उपस्थित होते. आभार प्रविण पाटील यांनी मानले.
