प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गोरगावले आरोग्य केंद्रात गरोदर-स्तनदा मातांची आरोग्य तपासणी
चोपडा दि.१०(प्रतिनिधी)दिनांक 9/8/2025.शनिवार रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र-गोरगावले बु प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान कार्यक्रम घेण्यात आला.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ-सचिन भायेकर,जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी-डॉ. रमेश धापते यांच्या आदेशानुसारतथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदिप लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा तालुक्याभरातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान राबविले जात आहे.
गरोदरपणात माता मृत्यु होऊ नये, व ग्रामीण विशेषतः आदिवासी भागातील गरोदर मातांची तपासणी वेळेत होऊन, योग्य त्या रक्ताच्या तपासण्या, सोनोग्राफी, व इतर सर्व उपाययोजना वेळेच्या आधी जर झाल्यात तर त्यापासून गरोदर मातेला प्रसूती वेळी त्रास कमी होऊन इतर कोणत्याही प्रकारची अडचणी निर्माण होत नाहीत, त्यामुळे गरोदरमाता तथा बाळाला फायदा होतो, माता मृत्यू-बाल मृत्यू रोखण्यासाठी या अभियानाचा परिपुर्ण फायदा होतो.
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी-डॉ.मयुरेश माने, जिल्हा स्तरीय पर्यवेक्षक-विजय देशमुख, आरोग्य सहाय्यक-रविंद्र काटे, सुनील महाजन आरोग्य सहाय्यिका-श्रीम.ज्योती न्हायदे, आरोग्य सेविका-श्रीम.कल्पना सोनवणे, आरोग्य सेवक-आशिष लोसरवार, अनिल माळी आशा सेविका उपस्थित होत्या, यावेळी गरोदर मातांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली, तसेच आहाराविषयी, स्तनपाणाविषयी, लसीकरण विषयी योग्य असे आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.
उपस्थित गरोदर मातांची उंची, वजन, रक्तातील हिमोग्लोबिन, साखरेचे प्रमाण, उच्च रक्तदाब, HIV ची तपासणी, आदी सर्व तपासण्या करून, हायरिस्क मातांना, मोफत सोनोग्राफी करण्यासाठी संदर्भीत करण्यात आले.