रॅलीत आलेल्या आदिवासींसाठी पाणी बॉटल वाटप
चोपडा दि.१०(प्रतिनिधी)जागतिक आदिवासी दिना निमित्त चोपडा शहरात आलेल्या आदिवासी बांधवांसाठी मोफत जलसेवेचे आयोजन चोपडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे सुनिल पाटील वाळकी, चोपडा (माजी जि. प. सदस्य )व सचिन सांगोरे उमर्टी, चोपडा ह्यांच्या तर्फे करण्यात आले. या प्रसंगी श्री. घनश्याम भाऊ अग्रवाल, श्री परेश देशमुख, श्री गिरीष देशमुख, नोमान काझी, जिय्योद्दीन काझी, तुकाराम बापू,हिंगोणा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील सर, भुषण धनगर ईत्यादी उपस्थित होते