जूचंद्रचे अशोक किणी सेवानिवृत्ती प्रित्यर्थ शाळेस व विद्यार्थ्यांना साहित्य भेट

 जूचंद्रचे अशोक किणी सेवानिवृत्ती प्रित्यर्थ शाळेस व  विद्यार्थ्यांना साहित्य भेट

वसई दि.१०(प्रतिनिधी) : आज सगळीकडे सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या मित्रांना नातेवाईकांना जेवणाच्या पार्ट्या देऊन आपला आनंद द्विगणित करतात. मात्र जुचंद्र येथिल शिव छत्रपती समाज सेवा मंडळाचे सदस्य अशोक सखाराम किणी हे रेल्वेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांनी विक्रमगड तालुक्याच्या दुर्गम भागातील विद्यादान विद्यामंदिर आंबेघर शाळेत खुर्च्या  टेबल कपाट व विद्यार्थ्यांना शाळेत साहित्य वाटप करून तसेच कामण आश्रमशाळेच्या पाचशे विद्यार्थ्यांना अन्नदान करून सेवानिवृत्तीचा आनंद द्विगुणित केला.

 जूचंद्र येथील शिव छत्रपती समाज सेवा मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमास मंडळाचे संस्थापक पुरुषोत्तम पाटील, मेघनाथ पाटील, मिलिंद पाटील, विद्याधर भोईर, सुरज भुसारा व शाळेचे शिक्षक उपस्थित होते. अशोक किणी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना कंपास व खाऊ वाटप. तसेच शाळेत कपाट खुर्च्या टेबल इत्यादी साहित्य वाटप केले. पुरुषोत्तम पाटील यांनी अशोक किणी यांचे मनापासून कौतुक करून मंडळांनी त्यांना बिकट परिस्थितीत नोकरीसाठी  सहकार्य केले त्याची जाणीव ठेवून त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला आणि आज अतिशय गरज असलेल्या शालेस वाटप करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक डुकले सर ह्यांनी आभार व्यक्त केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने