सावली सहयोग संस्थेतर्फे दिव्यांगांना रेशन कीट वाटप
मुंबई दि.१०(प्रतिनिधी)सावली सहयोग संस्थेचे संचालक कालकथित महेंद्र नलावडे यांच्या 2 ऱ्या पुण्यतिथी निमित्त विभागातील एकूण दिव्यांग बांधवांना रेशनिंग किट वाटप संस्थेच्या माध्यमातून देण्यात आले. तसेच विभागातील दिव्यांग बांधवांना /जेष्ठ नागरिकांना नगरसेवक श्री.समाधान सरवणकर यांनी छत्री देऊन एक हात मदतीचा केला त्याबद्दल संस्थेच्या माध्यमातून त्याचे संस्थेचे अध्यक्ष आयु.राजेश घोलप यांनी आभार मानले.
यावेळी संस्थेचे सचिव आयु. अनिल घोडके व संस्थेच्या खजिनदार सौ. पुजा सावंत मँडम यांनी कालकथित महेंद्र नलावडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सौ.पुजा कासारे यांनी प्रतिमा पूजन केले .सौ कूतिका जाधव मँडम(जिल्हा अध्यक्ष उत्तर मध्य मुंबई वंचित) या आवर्जून उपस्थित होत्या.