आ. चंद्रकांत सोनवणेव माजी आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या नेतृत्वात चोपड्यात आदिवासी दिन उत्साहात साजरा साजरा
चोपडा,दि.१०(प्रतिनिधी) : ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक स्तरावर आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो . त्याच धर्तीवर चोपडा येथे दरवर्षाप्रमाणे आदिवासी दिवस मोठ्या धुमधडाक्यात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला . यंदा ही उत्साहात आदिवासी बांधव उत्सवासाठी शहरातील रस्त्यावर उतरले.
या वेळी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे माजी आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या आवारातून आदिवासी बांधवांनी उत्साहात रॅली काढली. रॅलीत आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा करून आदिवासी नृत्य सादर केले. आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वात रॅलीला बाजार समितीतून सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पाटील दरवाजा, आझाद चौक, संभाजी महाराज चौक, धनवाडी फाटा मार्गे बाजार समितीत समारोप आल्यानंतर रॅलीचा समारोप झाला. या वेळी डॉ . अमृता चंद्रकांत सोनवणे बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, किशोर चौधरी, विकास पाटील, डॉ. अमृता सोनवणे, रावसाहेब पाटील, शिवराज पाटील, विजय पाटील,किरण देवराज यांच्यासह बहुसंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते. या वेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.