काजीपूरा येथे वर्षावास पुष्पमाला दहा कार्यक्रम संपन्न

 काजीपूरा येथे वर्षावास पुष्पमाला दहा कार्यक्रम संपन्न

 


चोपडा दि.२५(प्रतिनिधी) : काजीपूरा ता.चोपडा येथे दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चोपडा तालुक्याच्या वतीने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा वर्षवास कार्यक्रम जिल्हाच्या व राज्याच्या नियोजनानुसार सुरू असून आज वर्षवास पुष्प माला क्रमांक दहा कार्यक्रम संपन्न झाला, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बापूराव वाणे सर हे होते. सदर वर्षवास मालिकेचे उदघाट्न काजीपूरा येथील सरपंच सूर्यकांत मधुकर पाटील,बौध्द उपासिका यांच्या हस्ते करण्यात आले.

      आजच्या विषय- बौद्धांची आचार संहिता या विषयावर प्रवचनकार महेंद्र म्हैसरे, बौद्धाचार्य* यांनी सखोल असे या विषयावर धम्म देसना दिली.यावेळी शालिकग्राम करंदीकर,भरत शिरसाठ व इतर मान्यवर यांनी ही मार्गदर्शन केले.वर्षावास कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रमेश गोबा सोनवणे यांनी केले.

       सदर कार्यक्रमास बापूराव वाणे,जानकीराम सपकाळे,भरत शिरसाठ,शालिकग्राम करंदीकर,सुकदेव बाविस्कर ,रमेश गोबा सोनवणे,वसंत शिंदे,माजी सरपंच पंडीत सिताराम सोनवणे, रमेश सखाराम सोनवणे, छगन सिताराम सोनवणे, दिपक शिवाजी सपकाळे, हिम्मत बाबुराव सोनवणे, आधार हरचंद सोनवणे, प्रमेश्वर भटू जाधव,विक्की पंढरीनाथ सोनवणे,इतर बौध्द उपासक,उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने