चोपड्याच्या रेडक्रॅास सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रवीण गुजराथी
चोपडा,दि.२५(प्रतिनिधी) - येथील इंडियन रेडक्रॅास सोसायटीच्या चेअरमन पदावर प्रवीण विठ्ठलदास गुजराथी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.या सोसायटीच्या इतिहासात वडील व पुत्राने अध्यक्षपद सांभाळल्याचे प्रथमच समोर आले आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण गुजराथी यांचे वडील स्व.विठ्ठलदास छगनलाल गुजराथी अनेक वर्षे अध्यक्षपदी होते.रेडक्रॅासच्या संचालक मंडळात प्रविण गुजराथी,डॉ. रविंद्र गुजराथी, डॉ. सुनिल देशपांडे,डॉ. परेश टिल्लु, अशोक गुजराथी, प्रफुल्ल गुजराथी, प्रकाश चायल, निलेश राजेंद्र जैन,डॉ. नरेंद्र शिरसाट,डॉ. दिलीप अडावदकर यांचा समावेश आहे.
इंडियन रेडक्रॅास सोसायटीने आसकरण ताराचंद जैन रक्तपेढी चालविली आहे.या रक्तपेढीमुळे अनेक गरजू रूग्णांना अडचणीच्या काळात रक्त उपलब्ध करुन दिले आहे.अनेक रक्तदान शिबिरेही आयोजित केली आहेत.स्वर्गीय वडीलांच्या समाजसेवेचा वारसा यापुढेही रेडक्रॅासच्या माध्यमातून सुरु ठेवण्याचा मानस प्रवीण गुजराथी यांनी व्यक्त केला आहे.