धुळ्याच्या दोघांना २ गावठी कट्ट्यांसह अटक.. चोपडा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई
चोपडा दि.२५(प्रतिनिधी)चोपडा ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाईत २ गावठी कट्टा व जिवतं काडतुसांसह धुळ्याच्या दोघा आरोपींना शिताफीने पकडून जेलची हवा दाखविली आहे.त्यांच्या ताब्यातील १लाख ५१हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील वैजापूर गावाकडून दोन इसम हे पल्सर मोटार सायकलने अग्निशस्त्र (गावठी कट्टा) व राऊंड घेवून येणार असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारावर बोरअंजटी ता.चोपडा शिवारातील फॉरेस्ट नाक्यासमोर रोडवर ग्रामीण पोलीसांनी नाकाबंदी करून वाहन तपासणी करीत असताना एका काळ्या रंगाची पल्सर मोटार सायकलवरून दोन इसम आले असता पोलीसांनी त्यांची झाडाझडती घेतल्यावर पल्सर मोटार सायकल चालक जयेश सुरेश धापटे वय 22 वर्ष रा. सहजीवननगर दसेरा मैदान जवळ स्टेशन रोड धुळे व पाठीमागे असलेल्या इसमाचे नाव फत्तेसिग मिलनसिंग भादा वय 20 वर्षे रा.दंडेवाले बाबा नगर मोहाडी ता.जि. धुळे असे असल्याचे आढळून आले त्यानंतर दोन्ही इसमांची अंगझडतीत जयेश सुरेश धापटे यांच्या पॅन्टचे उजवे बाजूचे कमरेस पाठीमागे आतुन एक गावठी बनावटीचा गावठी कट्टा( पिस्टल) तसेच उजवे बाजूचे खिशात जिवंत काडतूस मिळून आले. तसेच मोटार सायकलवरील पाठीमागे बसलेल्या इसमाची अंगझडतीत त्याचे पॅन्टचे उजवे बाजूस कमरेस पाठीमागे एक गावठी बनावटी गावठी कट्टा (पिस्टल) मिळून आला.दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन एक बजाज कंपनीची पल्सर मोटार सायकल बिना नंबर प्लेट असलेली, 01 विवो, 01 ओपो कंपनीचे असे दोन मोबाईल हेण्डसेट व 02 गावठी कट्टे व जिवंत काडतुस असा एकूण 151,000/-रूपये किमतीच्या मुद्देमाल हस्तगत करून अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोकॉ. तिरूपती सखाराम खांडेकर यांचे फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीसात CCTNS गुरनं.२२४/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ७/२५, म.पो. अॅक्ट कलम ३७(१) (३) चे उलंघन १३५ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी , अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर ,उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.महेश टाक, सफौ राजू महाजन, पोहेकाँ राकेश पाटील-पोकाँ विनोद पवार, पोकाँ विठ्ठल पाटील, चालक पोकाँ वसंत कोळी यांनी केली .