अडावद येथील शामराव येसो महाजन विद्यालयात स्वातंत्र्य दिवस उत्साहात संपन्न


 अडावद येथील शामराव येसो महाजन विद्यालयात स्वातंत्र्य दिवस उत्साहात संपन्न 

अडावद ता. चोपडादि.१८ (प्रतिनिधी) येथील श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित शामराव येसो महाजन विद्यालया व खाजगी आदर्श प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष भगवान महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.  

    यावेळी  गुणवंतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात शितल अशोक माळी, लितिक्षा दत्तात्रय चव्हाण ,भारती अनिल पवार , स्नेहल रामचंद्र महाजन, यामिनी विजय महाजन यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

        इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत केली. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थी व पालकांनी टाळ्या वाजवून सर्वांचे कौतुक केले.

    संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. काशिनाथ तोताराम माळी व ज्यांनी शाळेला जमीन दिली ते शामराव येसो महाजन यांच्या तैलचित्रांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

       यावेळी संस्थेचे अध्यक्ष भगवान महाजन, उपाध्यक्ष वासुदेव महाजन, सचिव रमेश पवार, सहसचिव तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर. डी. माळी, संचालक तुळशीराम महाजन, मुरलीधर महाजन, शिवदास महाजन संचालिका गीताबाई काशिनाथ महाजन, आशाबाई .  ज्ञानेश्वर महाजन, माजी सरपंच भावना पंढरीनाथ माळी, माजी सरपंच भारती सचिन महाजन, भटू महाजन आदींसह पालकांची उपस्थिती होती.

     या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक आर. के. पिंपरे, उपशिक्षक व्हि. एम. महाजन, एस.जी.महाजन, एम.एन. माळी, पि. आर. माळी, एस बी. चव्हाण, एस. के. महाजन, पि.एस. पवार, लिपिक सी.एस. महाजन, ईश्वर मिस्तरी, रवींद्र महाजन, कैलास महाजन,अशोक महाजन , तसेच आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डि. बी. महाजन, आर. जे. महाजन, एस. टी. महाजन ,

वाय. एल. साळुंखे, डि. आर. वाघ, कामिनी चौधरी, पुनम सुतार आदींनी परिश्रम घेतले.

     कवायत संचालन एम. एन. माळी , पि. आर. माळी यांनी केले. प्रास्ताविक व्ही. एम. महाजन तर सुत्रसंचलन व आभार एस. जी. महाजन यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने