सत्रासेन आश्रमशाळेत अंमली पदार्थ प्रतिबंध अभियानांतर्गत निबंध स्पर्धा उत्साहात

 सत्रासेन आश्रमशाळेत अंमली पदार्थ प्रतिबंध अभियानांतर्गत निबंध स्पर्धा उत्साहात

सत्रासेन,ता. चोपडा ,दि.१६(प्रतिनिधी) – "अंमली पदार्थाला नकार – आरोग्यदायी जीवनाला स्वीकार" या घोषवाक्याचा नारा देत चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन महाराष्ट्र पोलीस व धनाजी नाना प्राथमिक, डी आर बी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, सत्रासेन यांच्या संयुक्त विद्यमानाने  अंमली पदार्थ प्रतिबंध अभियानांतर्गत भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक मा. महेश टाक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास सहाय्यक पोलिस निरीक्षक शेषराव एस. नितनवरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल शशिकांत पारधी, संस्थेचे सचिव नानासाहेब ज्ञानेश्वर रायसिंग भादले, सत्रासेन गावाचे लोकनियुक्त सरपंच तसेच माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वंदना भादले प्रमुख उपस्थित होते.

या निबंध स्पर्धेत तब्बल १४३ उच्च माध्यमिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी आपली मते प्रभावी शब्दांत मांडली. स्पर्धेत कृष्णा जगदिश पावरा प्रथम, सोनिया पावरा द्वितीय द्वितीय तर  महावीर सदाशिव पावरा तृतीय आदी विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले. विजेत्यांना रोख बक्षिसे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव एस. नितनवरे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

स्पर्धेचे सुरळीत आयोजन करण्यासाठी नरेंद्र देसले, मनोज पाटील,  गजानन पाटील, भालचंद्र पवार, योगेश पाटील यांनी सुपरवायझर तर झुलाल करंकाळ, संजय शिरसाळे व कैलास महाजन यांनी परीक्षक म्हणून कार्य पार पाडले.

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रविंद्र भादले, उपाध्यक्ष धनंजय भादले व सर्व संचालक मंडळ यांची शुभेच्छा लाभली. तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनींनी मनःपूर्वक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने