ज्येष्ठ नागरिक संघात उत्साहात ध्वजारोहण संपन्न !
चोपडादि.१६( प्रतिनिधी)स्वातंत्र्य दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हयातील एक सक्रिय संघ म्हणून नावलौकिक असलेल्या चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात संघाचे अध्यक्ष श्री . जयदेव देशमुख यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले .
खूप मोठ्या संख्येने उपस्थित ज्येष्ठ नागरिक संघ सदस्यांचा ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तचा उत्साह हा मनोयुवा, वयोवृद्धा : ह्या संघ ब्रिद वाक्यानुसार तरुणांना लाजविणारा होता हे ७८ वर्षीय संघ उपाध्यक्ष श्री.जे. एस. नेरपगारे यांनी ज्या उत्साहाने, तडफेने समर गीत सादर केले यावरून प्रचिती आली . यावेळी संघ भवन आवारात नव्याने उभारलेला ध्वजस्तंभ व कार्यक्रमांसाठी बांधलेला ओटा यासाठी आर्थिक योगदान देणाऱ्यांच्या नावाची कोनशिला अनावरण संघाचे ज्येष्ठ संचालक व माजी नगराध्यक्ष श्री .रमणलाल गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले .तसेच या प्रसंगी आर्थिक साक्षरता व ज्येष्ठांसाठी बंधन बँकेच्या योजना या विषयी बंधन बँक व्यवस्थापक श्री .तरुण रॉय यांनी ज्येष्ठांना माहिती सांगितली . ध्वजारोहण सोहळ्याचे निमित्त साधून संघाचे सहसचिव इंजि . विलास एस .पाटील यांचा, त्यांना जळगाव रोटरी क्लब ऑफ स्टारचा रोटे . स्व .डॉ प्रताप जाधव यांच्या नावाचा रोटरी कार्यसेवा गौरव पुरस्कार मिळाल्या निमित्त सत्कार करण्यात आला .संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संघ सचिव विलास पाटील सर खेडीभोकरीकर यांनी मानलेत७५ ते ८० ज्येष्ठ नागरिक संघ सदस्यांनी उपस्थिती देत अत्यंत उत्साहाल ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला .