कठोरा नगरीचा वैद्यकीय दक्षिणसीमा बुरुज ढासळला.. डॉ.विलास पवार यांचे अकस्मात निधन
चोपडा दि.१(प्रतिनिधी)तालुक्यातील कठोरा नगरीला चंद्र आणि सूर्य प्रमाणे लाभलेले अनमोल असे तारे म्हणजे ज्येष्ठ डॉ.साहेब श्रीयुत सोनवणे दादा व दुसरे डॉ.साहेब श्रीयुत विलासजी पवार उर्फ पवारआप्पासाहेब.. दोन्ही डॉ.साहेबांनी ज्येष्ठ डॉ.सोनवणे दादा यांनी गावाची वैद्यकीय उत्तर सीमा तर पवार आप्पांनी दक्षिण सीमा सांभाळली होती. पंचक्रोशीतील नागरिकांना जणू उपचारासाठी गुरुकिल्ली हाती लागली होती.दि.१ जुलै २०२५रोजी डॉ.विलास पवार यांचे अकस्मात निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
महामारीच्या (आजारांच्या) साथी जसे की, चिकनगुनिया, ब्लड फ्यू, डेंग्यू, आणि सगळ्यात भयंकर "कोरोना" या काळात गावाची अविरतपणे सेवा करणारे दिवस रात्र काळ, वेळ, पैसा कधी न पाहणारे सदैव सेवेसी तत्पर असे काम होते...पण कोण जाणे विधात्याच्या मनात काय होते आज संध्याकाळीच त्याने पवारआप्पांना बोलवून घेतले, आप्पाआज सकाळी आपली कर्मभूमी सोडून, मायभूमी पारोळा तालुक्यातील टोळी या गावी काही कार्यक्रमासाठी गेले अन् मायेच्या कुशीतच जणू कायमचे सामावले..
निधनाची बातमी गावांत आल्या आल्या वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि गावावर जणू वीज कोसळल्यागत गाव सुन्न झालं कोणाचा विश्वास अजूनही बसत नाही की पवारआप्पा सोडून गेले. गरीब असो वा श्रीमंत असो कोणत्याही जाती धर्माचा असो गावातील असो अथवा खेड्यावरील असो सर्वांशी सदैव हसत मुखाने बोलून उपचार करणे हेच त्याचे तत्व होते..सर्व गावाशी गोडी गुलाबीने,थट्टा मस्करीन, गावं आपलंस करणारे वैद्यकीयच नाही तर सर्वच बाबतीत मदतीला धावणारे व्यक्तिमत्त्व आज आपल्या कठोरा नगरीला कायमच पोरंक करून निघून गेले हीच मनी मोठी खंत राहिली....*आदरणीय पवारआप्पा साहेबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण