भारतीय जैन संघटना चोपडा यांचे सौजन्याने विविध शाळेत शालेय साहित्याचे वितरण

 भारतीय जैन संघटना चोपडा यांचे सौजन्याने विविध शाळेत शालेय साहित्याचे वितरण 


चोपडा दि.१८(प्रतिनिधी)भारतीय जैन संघटना चोपडा यांचे सौजन्याने व जैन समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने चोपडा तालुक्यातील विविध शाळेत शिकणाऱ्या आदिवासी व गरीब विद्यार्थींना पाटी, पुस्तक, पेन्सिल ,कंपास ,वही असे साहित्य वितरित करण्यात आले

चोपडा शहरातील जि प मुलांची शाळा नं.3 चुंचाळे येथील नूतन विद्यालय, वराड येथील जि प उच्च प्राथमिक शाळा, मूक बधिर शाळा चोपडा येथील विद्यार्थ्यांना व चहार्डी येथे खदानित काम करणारे कामगारांचे पाल्यांना असे  चारशे  विद्यार्थ्यांना  प्रत्यक्ष जाऊन सदरील शैक्षणिक साहित्य देण्यात आले

 जिल्हाध्यक्ष निर्मल बोरा, जिल्हा सचिव दर्शन देश लहरा, माजी जिल्हा सचिव दीपक राखेचा यांचे पुढाकाराने व   माजी अध्यक्ष आदेश बरडीया, तालुकाध्यक्ष गौरव कोचर, तालुका सचिव मयंक बरडीया, जिल्हा सदस्य अभय ब्रम्हेच्या, माजी जिल्हा सचिव चेतन दर्डा, महिला जिल्हा सदस्य योगिता बोथरा, महिला तालुकाध्यक्ष माधुरी बरडीया, महिला सचिव सरिता टाटिया, पूजा बोरा, आकाश सांड, प्रेम चोपडा, व सदस्यांनी प्रत्यक्षात शाळेत भेट देऊन शालेय साहित्य व वही वाटप चे नियोजन केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने