मोखाडा दुर्गम भागात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खुर्ची व स्टूलचे वाटप
वसई दि.१८(प्रतिनिधी)श्री रामलाल जे बगडिया चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व प्रवीण पाटील तंत्रनिकेतन भाईंदरच्या प्राचार्या सौ. रंजना भूषण पाटील यांच्या संयुक्त विद्यमानाने व जुचंद्र येथील शिव छत्रपती समाज सेवा मंडळाच्या सहकार्याने मोखाडा तालुक्याच्या दुर्गम भागातील इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतच्या ४५० आदिवासी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, कंपास व टेबल खुर्च्यांचे वाटप करण्यात आले.
श्री रामलाल जे बगाडिया चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आदिवासी विद्यालय मोखाडा, येथील १०५ विद्यार्थ्यांना वह्या,पेन,बिस्किट चे वाटप बगाडिया ट्रस्टचे सेवक अनिल सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रवीण पाटील तंत्रनिकेतनच्या प्राचार्या सौ रंजना पाटील यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त मोखाडा आदिवासी हायस्कूल साठी, खुर्च्या - स्टूल विद्यार्थ्यांना कंपास साहित्य भेट दिले. तसेच आदिवासी हायस्कूल पोशेरा व आदिवासी हायस्कूल वाशाळा, मोखाडा व विद्यादान विद्यामंदिर आंबेघर विक्रमगड येथील ३४५ विद्यार्थ्यांना बगाडिया ट्रस्टतर्फे वह्या,पेन,बिस्कीट वाटप करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी शिव छत्रपती समाज सेवा मंडळाचे संस्थापक पुरुषोत्तम पाटील, मेघनाथ पाटील, विद्याधर भोईर उपस्थित होते. मोरांडा हायस्कूलसाठी मदत केल्याबद्दल रंजना पाटील व बगाडिया ट्रस्टचे पुरुषोत्तम पाटील यांनी आभार मानले.