महाजन इंग्लिश क्लासेसची जीएसटी परीक्षेत निकालाची परंपरा कायम..१८ विद्यार्थ्यांना ९५ वर गुण

 

महाजन इंग्लिश क्लासेसची जीएसटी परीक्षेत निकालाची परंपरा कायम..१८ विद्यार्थ्यांना ९५ वर गुण



चोपडा दि.१८(प्रतिनिधी):- माहे फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या जीएसटी ग्रामर टॅलेंट सर्च परीक्षेत महाजन इंग्लिश क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी  निकालाची परंपरा कायम राखत उत्तुंग यश संपादित केले आहे. संचालक दीपक महाजन सर यांनी शिस्त व इंग्रजी व्याकरण विषयी सखोल मेहनत घेतल्याने यश संपादक करता आल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.त्या निकालात 95 कोणाच्या वर एकूण 18 विद्यार्थी तर  90 गुणांच्या वर एकूण 45 विद्यार्थी व 80 गुणांच्या वर 55 विद्यार्थ्यांनी यश संपादित केले आहे.

शेकडा 95 गुणांच्या वर यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे : केनिया महाजन (गुण98 ),रोहन चौधरी (98), संचित बडगुजर (98), सानवी पाटील (97 )रेहान तडवी (97), तेजल वानखेडे( 96), स्वयंप्रभा पाटील (96 ),मनाली पाटील (96), सारस कोथळकर (96 ),आदित्य महाजन( 96), संस्कार शिरसाट (96 ),आर्यन पाटील (96 ),काव्या वाघ (95), जितेंद्र चौधरी (95) ,श्रावणी गरजे( 95) ,उर्वीच्या देवरे (95) हृदया पाटील( 95 ) या सर्व विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय प्रा. दीपक महाजन सर यांना दिले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थी झळकल्याने क्लासेसचा  नावाचा  गवगवा होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने