शिक्षक संजय साळुंखे यांचा सत्कार संपन्न

 

शिक्षक संजय साळुंखे यांचा सत्कार संपन्न

चोपडा दि.१४(प्रतिनिधी): शिक्षक क्लब ऑफ जालना आयोजित राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल  संजय साळुंखे  यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
               डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमीत्त ही स्पर्धाआयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत संजय श्रीपत साळुंखे (शिक्षक वराड ता, चोपडा ) यांनी डॉ बाबासाहेबांनी ज्या विषयात जागतिक स्तरावर लेखन केले आहे व जो समाजापासून , देशापासून अनभिज्ञ आहे अशा  अर्थशास्त्र या विषयावर मी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर
एक अर्थशास्त्रज्ञ "या विषयावर निबंध लिहिला. त्यात त्यांचा जळगाव जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळाला त्याबद्दल डाएट जालन्याचे प्राचार्य जोशी सर यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. याप्रसंगी 100 शिक्षक क्लब चे अध्यक्ष राजेभाऊ मगर सर, मुळे सर, पठाण सर इ. उपस्थित होते. त्यांचे तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने