चोपडा ललित कला केंद्राचा फौंडेशन अभ्यासक्रमाचा निकाल १००%
चोपडा,दि.२०(प्रतिनिधी) :- येथील महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ,मुंबई अंतर्गत शासकीय उच्च कला परीक्षा 2025 चा फौडेशन वर्गाचा निकाल नुकताच जाहीर झाला त्यात भगिनी मंडळ, चोपडा संचलित, ललित कला केंद्र चोपडा,फौडेशन वर्षाचा निकाल १००% लागला असून फौडेशन मधून प्रमोद महेश वारुळे(पारोळा) हा प्रथम क्रमांकाने तर रजत विजय खंडारे (बुलढाणा)व्दितीय व उत्कर्ष अभय नागपुरे(चोपडा) तृतीय क्रमांकाने पास झाले.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ. पूनमताई गुजराथी व सहसचिव अश्विनीबेन गुजराथी, उपप्राचार्य डाॅ.आशिष सुभाषलाल गुजराथी आणि सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले. तर पुढील वर्षात तत्काळ प्रवेश घेऊन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान प्राचार्य सुनील बारी, प्रा. विनोद पाटील, प्रा. संजय नेवे आणि लिपीक श्री.भगवान बारी,सेवक श्री. अतुल अडावदकर व प्रवीण मानकरी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.