चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात धडाकेबाज पोनि अनिल भवारी रूजू.. कावेरी कमलाकर यांची जळगाव शनिपेठला बदली
चोपडा दि.८(प्रतिनिधी):चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी जळगाव शहर पोलीस ठाण्याचे अनिल भुयारी यांची नुकतीच नियुक्ती झाली असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार आज दि.८रोजी स्विकारला आहे.
चोपडा ग्रामीणच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांची जळगाव शनिपेठ पोलीस स्टेशन येथे नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्या जागी चोपडा ग्रामीणला धडाकेबाज पोनि अनिल भुयारी यांची नेमणूक करण्यात आली आहे जिल्हाभरात पोलीस प्रशासनात बऱ्याच अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आल्याने ही नियुक्ती झाली आहे. पहिल्या टप्प्यात 14 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. चोपडा ग्रामीणला नव नियुक्त पोलीस निरीक्षक अनिल भुयारी यांनी नुकताच चार्ज स्वीकारला असून खुर्चीवर विराजमान झाले आहे त्यांनी याआधी नांदगाव, मालेगाव कॅम्प, येवला तालुका, जळगाव शहर पोलीस ठाण्यासह आदी ठिकाणी धडाकेबाज कामगिरी बजावली आहे. चोपडा ग्रामीण भागात गावठी पिस्तूल बनवणे, विक्री करणे तसेच गांजा विक्री व इतर अवैध धंदे जोरात फोफावले आहेत त्यामुळे नागरिक प्रचंड हवालदिल झाले आहेत आता नवनियुक्त साहेब अवैध धंद्यांच्या बिमोड आपल्या धडाकेबाज शैलीत करतील याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.