५ जून जागतिक पर्यावरण दिवस साजरा
चोपडा,दि. ५( प्रतिनिधी ): चुंचाळे ता.चोपडा दि.५जून२०२५. गावाचे युवा पोलीस पाटील सुनील महाजन यांनी जागतिक पर्यावरण दिवस अनोखा पद्धतीने साजरा केला पर्यावरण संतुलनासाठी "मोह वृक्षाच्या वाडीत" मध संकलनासाठी मोहवृक्ष फुलोरावर असताना ठेवण्यात आलेल्या मधपेट्या मध संकलनासाठी 15 मार्च ते 20 मे जागतिक मधुमक्षिका दिवसापर्यंत मेलीफेरीया प्रकारातल्या मधमाशीच्या वसाहत पेट्या ठेवलेल्या होत्या. त्या पेट्या स्थलांतरित करून व त्या पेटीसोबत नारळाची रोपे कोकण भाटे व कोकण प्रताप या नारळाच्या नवीन संशोधित वाण रोपांचे वाटप भूमिपुत्र समूहाची प्रमुख प्रवर्तक बी जी महाजन यांच्या हस्ते भूमिपुत्र गटाच्या सदस्यांना पर्यावरण दिवसाची निमित्ताने पर्यावरण व जैवविविधता संगोपनातून मधमाशी वसाहत पेटी व नारळाची रोपे देऊन पर्यावरण दिवस साजरा केला . याप्रसंगी ललिताबाई राजू बारेला वनिता प्रदीप बारेला सीरमाबाई गुर्जा बारेला मुन्नीबाई राजू बारे ला बसंतीबाई नाजू बारेला बसंती सुरभान पावरा संजना रोशन पावरा सुनीताबाई काळू भिल्ल बायलाबाई शंकर बारेला तसेच भूमिपुत्र समूह संचलित आदिवासी महिला गटाच्या अध्यक्ष व संचालीका सह महिला सदस्य उपस्थित होत्या.