विटनेर जि.प. शाळेत मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत.. शालेय साहित्य वाटप

 

विटनेर जि.प. शाळेत मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत.. शालेय साहित्य वाटप 

चोपडा दि.१७(प्रतिनिधी): आज दिनांक 16 जून 2025 रोजी जि.प. उच्च प्राथमिक  शाळा विटनेर येथे इयत्ता पहिली दाखल पात्र नवोगतांचे स्वागत व शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम चोपडा  न.प.चे  मुख्याधिकारी श्री राहुल पाटील, विटनेर गावाचे  सरपंच ,उपसरपंच सदस्यगण, तसेच सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सदस्य पालकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला.

         कार्यक्रमावेळी शालेय गणवेश, बूट, सॉक्स,लेखन साहित्य व मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. नवोगतांचे स्वागत करण्यात आले. स्वत: मुख्याधिकारी हे प्रभातफेरीत सहभागी झाले होते.  माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम आकर्षणाचा मुद्दा ठरला.*  

     मुख्याधिकारी श्री राहूल पाटील यांनी पहिलीच्या विद्यार्थ्यांशी हितगुज केले व त्यांचा उत्साह वाढवला. शाळेचे  मुख्याध्यापक श्री भास्कर धनगर सरांनी शाळेच्या गेल्या वर्षभरातील विकास व गावातील सहकार्याबद्दल माहिती सादर केली.

        कार्यक्रमावेळी श्री हेमंत पाटील सरांनी सूत्रसंचालन केले शाळेची योशोगाथा सांगितली श्री.नामदेव अहिरे सरांनी . विद्यार्थ्यांसाठी लेखन साहित्य दिले. शाळेतील  शिक्षिका श्रीमती सुनिता श्रीराम गावळ यांनी रांगोळी काढून शालेय परिसर सुशोभित केला तसेच शिक्षण प्रेमी नागरिक व गावकरी  या सर्वांच्या सहकार्यामुळे व मुख्याध्यापकांच्या उत्कृष्ट  नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. शेवटी मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले व सर्व शिक्षक वृंदांचे कौतुक केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने