अडावद जि.प.शाळेत आमदारांच्या हस्ते पुष्पगुच्छ देत विद्यार्थ्यांचे स्वागत.. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची दमदार एन्ट्री अन् सेल्फीसह दप्तर वाटप


अडावद जि.प.शाळेत आमदारांच्या हस्ते पुष्पगुच्छ देत विद्यार्थ्यांचे स्वागत.. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची दमदार एन्ट्री अन् सेल्फीसह दप्तर वाटप

 अडावद ता.चोपडा दि.१८(प्रतिनिधी) :येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशोत्सवात आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे  यांनी सहभागी होत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

   १६ रोजी सकाळी दहा वाजता प्रवेशोत्सव कार्यक्रमास सुरुवात झाली.विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा  तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून यावर्षीपासून जिल्हा परिषद शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न लागू करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने इयत्ता पहिलीत दाखल पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेतच दाखल करावे असे आवाहन करण्यात आले.त्यास पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

आमदारांनी सांगितला त्यांच्या शाळेच्या पहिल्या दिवसाचा अनुभव

या शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी आपल्या शाळेच्या पहिल्या दिवसाचा अनुभव उपस्थितांसोबत शेअर करीत माझे शिक्षणही जिल्हा परिषदेच्या शाळेमधून झाले आहे. त्यांनी त्या कालावधीत होणारा शाळेतील प्रवेशा विषयी आठवणींना उजाळा देत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे होते. तर चोपडा पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी कविता सुर्वे यांची उपस्थिती होती.

सेल्फी, दप्तर वाटप आणि शालेय आठवणींना उजाळा

आजपासून राज्यभरातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून, शाळा प्रवेशोत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अडावद येथील जिल्हा परिषद मुलांची व मुलींची शाळा असा संयुक्त कार्यक्रम शाळेतील प्रांगणात सर्व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना दोन चार चाकी गाड्यांमध्ये शाळेत आणले. एवढेच नाही, तर त्यांचे स्वागत लेझिम पथकाने केले. आमदारांनी  विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.शाळेत सेल्फी काढत त्यांचे स्वागत केले. तसेच, विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके आणि दप्तरांचे वाटपही केले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात एका विद्यार्थिनीची पावले ओल्या कुंकवात रंगवून कोऱ्या कागदावर उमटविले या कार्यक्रमाने हा प्रवेश सोहळा आनंदमय झाला. यावर्षी पहिलीपासून सीबीएससी पॅटर्न सुरू झाला. असल्याने त्याचा सुंदर सेल्फी पॉईंट बनविण्यात आला होता. त्याचे अनावरणही आमदारांच्या हस्ते करण्यात आले. आमदारांनी आपल्या शाळेच्या जुन्या आठवणींना सांगत ग्रामीण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. सध्याचा टिव्ही आणि मोबाइलच्या युगात ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवण्याचे आव्हान शिक्षण क्षेत्राने स्वीकारावे त्यातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक वृद्धी करावी असा सल्ला दिला.

आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीने प्रवेशोत्सवाला आगळे महत्त्व

" पूर्वी एका घरात पाच ते सात बालके असायचे. तेव्हा पालक गुरुजींना येऊन मुलाला कडक शिक्षा करायला लावायचे. परंतु आताचे पालक शिक्षकांना माझ्या मुलाला मारणे तर दूरच रागवायचे देखील नाही अशी तंबीच देतात. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावा" 

 याप्रसंगी पहिलीच्या मुलींना दप्तर ,शैक्षणिक साहित्य ,बूट सॉक्स ,गणवेश पहिल्याच दिवशी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सर्व मुलींना स्कूल बॅग ग्राम विकास अधिकारी प्रमोद सैंदाणे यांच्याकडून देण्यात आले.

   यावेळी झालेल्या कार्यक्रमात चोपडा पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांनी केले जिल्हा परिषदेच्या शाळेमधून शिक्षण घेण्याचे आवाहन

" सर्व तालुक्यातील पहिली व दुसरीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे सीबीएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण शाळा सुरू होण्या अगोदरच झाले आहे. म्हणून पालकांना जास्तीतजास्त मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घ्यावा " असे आवाहन केले.

   यावेळी सरपंच बबनखा तडवी, उपसरपंच विजिता पाटील, वडगांव बु. चे माजी सरपंच नामदेव पाटील, विकासो संचालक लोकेश काबरा, सचिन महाजन, प्रकाश महाजन, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख जीवन माळी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम. के. शेटे, मंगल इंगळे, रामकृष्ण महाजन, ग्रामपंचायत सदस्य कालू मिस्तरी, संदीप महाजन, माजी उपसरपंच जावेदखा पठाण, माजी सरपंच यासू बारेला , कालसिंग बारेला, पिक संरक्षक संस्थेचे चेअरमन नरेंद्र पाटील, ग्रामविकास अधिकारी प्रमोद सैंदाने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नसरीन तडवी ,पत्रकार  जितेंद्रकुमार शिंपी,पीआर माळी, गणेश परदेशी, नरेंद्र खंबायत, रफिक मण्यार, महेश गायकवाड, विषय तज्ञ विशाल पाटील,  विषय तज्ञ मेश्राम , मुख्याध्यापक श्रीराम पाटील, राजेश अडवाल, शिक्षक प्रदीप महाजन, ग्रामस्थ ,पालक वर्ग ,विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने