नारायण नाना दूध संस्थेच्या चेअरमनपदी शांताराम पाटील तर उपाध्यक्षपदी श्रावण पाटील बिनविरोध

 

नारायण नाना दूध संस्थेच्या चेअरमनपदी शांताराम पाटील तर उपाध्यक्षपदी श्रावण पाटील बिनविरोध


गणपूर (ता चोपडा) चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करताना विविध संस्थांचे पदाधिकारी.

गणपूर (ता चोपडा) ता2:   जिल्ह्यातील अग्रगण्य दूध संस्थांपैकी एक असलेल्या येथील नारायणनाना दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी शांताराम देवराम पाटील यांची तर व्हाईस चेअरमन पदी श्रावण हरचंद पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी व्ही एस पाटील होते. चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची नावे जाहीर केली. यावेळी सर्व नवनिर्वाचित संचालक व संचालिका उपस्थित होत्या. त्यांच्या निवडीबद्दल विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.आगामी पाच वर्षात संस्थेला पुढे नेण्यासाठी व अधिकाधिक दूध संकलन कसे होईल यासाठी प्रयत्नशील असल्याचे नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी यावेळी जाहीर केले. त्यानंतर त्यांचा विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. बाळकृष्ण पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार मावळते चेअरमन विकास गोविंदा पाटील यांनी मानले.यावेळी संभाजी पाटील, प्रमोद पाटील, शिवाजी पाटील,सर्जेराव पाटील,गुलाबराव पाटील,विकास पाटील,मनोहर पाटील,  भगवान पाटील,सचिव भास्कर दीक्षित व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते .



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने