आयशरमध्ये कोंबून नेणाऱ्या १८ ऊंटांची सुटका..२९लाखांचा मुद्देमाल जप्त..तीन जणांना अटक

 

आयशरमध्ये कोंबून नेणाऱ्या १८ ऊंटांची सुटका..२९लाखांचा मुद्देमाल जप्त..तीन जणांना अटक


चोपडा,दि.२(प्रतिनिधी) ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील गलंगी गावाजवळ नाकाबंदी तपासणी करीत असतांना दोन आयशर गाड्यांमध्ये 18 उंटांना निर्दयपणे घेऊन जात असण्याचा प्रकार उघडकीस आला . यातील तिघांना पोलिसांनी शिताफीने पकडून अटक केली असून जवळपास 29 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ते तिघही  मध्य प्रदेशातील असून कत्तलीच्या इराद्याने उंटांना घेऊन जात असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
याबाबत ग्रामीण नाकाबंदी करीत असताना गोरक्षकांनी दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारावर  वाहनांची झाडाझडती  घेत असताना दोन आयशर गाड्यांमध्ये  उंटांना तोंडाला व पायाला निर्दयीपणे दोरीने बांधून गाडीत कोंबून घेऊन जात असल्याचे आढळून आले.यात१६ नरजातीचे तर २ मादी जातीचे उंट असून त्यांची एकत्रित किंमत जवळपास ९ लाख रुपये तर दोन आयशर ची किंमत २०लाख रुपये असा एकुण २९लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी हरी नायक मोतीलाल नायक (वय 35), खालील खान खलीत खान (वय 40) सद्दाम फकरू बागवान या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणी पोकॉ घनश्याम पवार यांच्या फिर्यादीवरून  चोपडा ग्रामीण पोलिसांत सी सी टी एन एस गुन्हा रजिस्टर क्रमांक 173 / 2025 प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक कायदा 1960 चे कलम 11(1) (सी) ( डी) (एफ् )महाराष्ट्र अधिनियम संरक्षण अधिनियम ५(ए ,बी.) महाराष्ट्र पोलीस ऍक्ट११९ कायदा कलम मोटार वाहन कायदा कलम 83 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास पोना.शशिकांत पारधी हे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने