हातेड येथील श्री शिवाजी माध्यमिक, उच्च माध्यमिक व किमान कौशल्य विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
चोपडा,दि.२१(प्रतिनिधी) तालुक्यातील हातेड येथील श्री शिवाजी माध्यमिक, उच्च माध्यमिक व किमान कौशल्य विद्यालय येथे अकरावा 'आंतरराष्ट्रीय योग संगम' दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
२१ रोजी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी.सी.पाटील यांनी योगाचे महत्त्व पटवून दिले व सुदृढ आरोग्याचा मंत्र दिला. उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व्ही.जी.राठोड व मोरे सर यांनी मुलांना योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. वार्मअप, सूर्यनमस्कार पासून सुरवात नंतर योगासनाची आसने ताडासन, त्रियक ताडासन, वक्रासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन , वीरभद्रासन, पादहस्तासन, वज्रासन, बालासन, पवनमुक्तासन, बद्धकोणासन, भुजंगासन, विरासन, शवासन, इत्यादी आसन घेत, प्राणायाम मध्ये भस्त्रिका प्राणायाम, कपालभाति प्राणायाम, बाह्य प्राणायाम, अनुलोम-विलोम प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, उद्गीथ प्राणायाम, ही योगासने शिकविली .यावेळी सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी योगाचे धडे घेतले.याप्रसंगी पर्यवेक्षक पी.आर.बाविस्कर, विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.